शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सला मुख्य जलवाहिनीतून पाणी

By admin | Updated: June 22, 2017 00:33 IST

नियमाप्रमाणे मुख्य जलवाहिनीमधून कोणालाही थेट पाणीपुरवठा करता येत नाही; परंतु कोपरखैरणेमध्ये रिलायन्स वसाहत व शाळेसाठी नियमबाह्यपणे नळजोडणी देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नियमाप्रमाणे मुख्य जलवाहिनीमधून कोणालाही थेट पाणीपुरवठा करता येत नाही; परंतु कोपरखैरणेमध्ये रिलायन्स वसाहत व शाळेसाठी नियमबाह्यपणे नळजोडणी देण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. कोपरखैरणेमध्ये दोन दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मोरबे परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना याच परिसरामधील रिलायन्स वसाहत व शाळेसाठी मात्र मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. संबंधितांना मुख्य जलवाहिनीमधून थेट नळजोडणी देण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोणालाही मुख्य जलवाहिनीमधून नळजोडणी दिली जात नसताना रिलायन्सवर वरदहस्त का, असा प्रश्न हांडेपाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी व रिलायन्स वसाहतीला इतर नागरिकांप्रमाणे जलकुंभावरून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनीही हे प्रकरण गंभीर आहे. राजाला वेगळा न्याय व प्रजेला वेगळा न्याय असा प्रकार सुरू आहे. रिलायन्स समूहाला थेट जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यात आला असेल तर तो तत्काळ खंडित करण्यात यावा व सर्वांना समान न्यायाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. शहर अभियंता मोहन डगावकर यांनीही पालिका कोणालाही मुख्य जलवाहिनीमधून नळजोडणी देत नाही. कोपरखैरणेमध्ये तशाप्रकारे जोडणी दिली असेल, तर त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. मोरबे धरण परिसरात महावितरणच्या फिडरमध्ये बिघाड झाला असल्याने विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोपरखैरणे व इतर परिसरामध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.