शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

राज्य ग्राहक निवारण आयोगाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:54 IST

ग्राहकांना घरे बांधून देण्याचे आदेश

पनवेल : स्वस्तात घरे बांधून देतो, हे सांगून शेकडो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला राज्य ग्राहक निवारण आयोगाच्या वतीने संपूर्ण घरे बांधून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहा महिन्यांत ही घरे बांधून देण्याचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहे. या प्रकरणी फसवणूक केलेल्या बिल्डरच्या जमिनीचा लिलाव करून १५ ग्राहकांना जमिनीच्या पैशांचे वाटप करावे, हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

पनवेल तालुक्यातील विहिघर, नेरेपाडा या गावांत हिंदुस्थान होम्स या विकासक कंपनीचे मालक चुनीलाल किशोरीलाल गुप्ता यांनी घरविक्रीच्या नावाने शेकडो ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. २०१२ पासून घर खरेदी करण्यासाठी पैसे घेणाºया कंपनीचे दोन्ही ठिकाणचे गृहप्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत. बिल्डरकडे वारंवार विनंती करूनही सुमारे १४१ ग्राहकांची ५ ते ८ लाखांची बुकिंग रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे १४ मार्च २०१६ रोजी फसवणूक झालेल्या १५ ग्राहकांनी रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली. मे २०१६ रोजी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित बिल्डरकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते.जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने विहिघर आणि नेरे येथील ६२.२० गुंठे जमिनीचा लिलाव केल्यानंतर १ कोटी ६८ लाख रुपयांना एका जमीनदाराने ही जमीन खरेदी केली. या लिलाव प्रक्रियेविरोधात उर्वरित ग्राहकांनी राज्य आयोग ग्राहक निवारण मंचाकडे दाद मागितल्यानंतर त्यास स्थगिती देण्यात आली. शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली असताना केवळ १५ ग्राहकांना पैसे मिळतील मग उर्वरित ग्राहकांनी काय करायचे, असा प्रश्न न्यायालयापुढे विचारण्यात आला. बिल्डर गुप्ता यांनीही ग्राहकांची बाजू घेत लिलाव रद्द केल्यास ग्राहकांना घरे बांधून देण्यास तयार असल्याचे मत न्यायालयापुढे मांडले.सहा महिन्यांत सर्व ग्राहकांना घरे बांधून देईन, या बोलीवर न्यायालयाने जिल्हा ग्राहक मंचाने केलेला लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात ग्राहकांचे वकील म्हणून अ‍ॅड. प्रणाली पाटील आणि अ‍ॅड. मनोज गाढवे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल