शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

पोलिसांकडून नियम धाब्यावर

By admin | Updated: October 28, 2015 01:08 IST

वाहतूक पोलीस रोडवर वाहने उभी करणाऱ्या दोनशे वाहनधारकांवर रोज कारवाई करीत आहेत. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारत असताना स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत

नामदेव मोरे, नवी मुंबईवाहतूक पोलीस रोडवर वाहने उभी करणाऱ्या दोनशे वाहनधारकांवर रोज कारवाई करीत आहेत. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारत असताना स्वत: मात्र सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत. बेलापूरमधील पोलीस मुख्यालयाबाहेरच रोडवर बिनधास्तपणे वाहने उभी केली जात आहेत. रस्ता अडविणाऱ्या पोलिसांच्या वाहनांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. सिडकोने नवी मुंबईचे केलेले नियोजन फसले आहे. शहरामध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. शहरातील वाहनांची संख्या ३,५८,६३९ एवढी झाली आहे. दुचाकी वाहनांची संख्या १ लाख ७० हजार ६३३ आणि कारची संख्या १ लाख १४ हजार ६७३ एवढी झाली आहे. व्यावसायिक वाहनांची संख्याही तब्बल ७३ हजार झाली आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्या प्रमाणात वाहनतळ विकसित केलेले नाहीत. वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे नाईलाजाने नागरिकांना रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत. परंतु रोडवर उभ्या केलेल्या वाहनांवर तत्काळ वाहतूक पोलीस कारवाई करतात. गतवर्षी नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्याप्रकरणी तब्बल ७३,५८१ वाहनांवर कारवाई केली होती. रोज सरासरी २०० ते २५० वाहनांवर कारवाई केली जात आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई केली जात असताना पोलीस स्वत: मात्र वाहतुकीचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. सीबीडीमधील पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर दोन ते तीन लेनमध्ये वाहने उभी केली जात आहेत. कोकण भवनकडून न्यायालयाकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. वाहतूक पोलीस दोन लेनमध्ये वाहने उभी केल्यास सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई करतात. परंतू पोलीस मुख्यालयाबाहेर स्वत: पोलीसच बेशिस्तपणे वाहने उभी करत असताना त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई केली जात नाही. स्वत: पोलीसच वाहतुकीचे नियम तोडत आहेत. मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर केला जात नाही. बहुतांश सर्व पोलीस स्टेशनच्या बाहेर पदपथावरही वाहने उभी करून ठेवली जात आहेत. कायद्याचे रखवालदारच नियम तोडत असताना त्यांच्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई केली नाही तर पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. सामान्य नागरिकांनी रोडच्या कडेला वाहन उभे केले की तत्काळ त्यावर कारवाई केली जाते. पदपथावरील वाहनेही उचलली जात आहेत. वाहतुकीस अडथळा नसलेल्या वाहनांवरही कारवाई होते. परंतु दुसरीकडे पोलीस मात्र स्वत:च रोडवर जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत आहेत. कायद्यापेक्षा पोलीस मोठे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून सर्वांना समान न्याय हवा, अशी अपेक्षा केली जात आहे.