शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील निराश्रितांची निवाऱ्यावाचून फरफट, पदपथांवर मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 00:49 IST

Navi Mumbai : महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील लोकसंख्येच्या अनुषंगाने शहरात विविध नोडमध्ये निवारा केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एकच निवारा केंद्र असल्याने शहरातील बेघर निराश्रित नागरिकांना पदपथ, रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत मुक्काम करावा लागत आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.बेघरांना वास्तव्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी न्यायालयाने ५ मे २०१० रोजी एक लाख लोकसंख्येमागे एक रात्र निवारा केंद्र महापालिकांनी उभारण्याचे आदेश दिले होते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या सूचनांचे पालन अद्याप करण्यात आलेले नाही. नवी मुंबई शहरात सुमारे ११ लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. देशातील विविध भागांतून नवी मुंबई शहरात आलेले परंतु निवाऱ्याची सोय नसलेले नागरिक नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत. नवी मुंबई शहरात महापालिकेने श्रमिक नगर येथील समाज मंदिर आणि तुर्भे सेक्टर २० येथे निवारा केंद्रे सुरू केली होती, परंतु विविध कारणांनी सदर केंद्रे बंद पडली आहेत. सध्या समहापालिकेचे सीबीडी सेक्टर ११ येथील उड्डाणपुलाखाली एकच निवारा केंद्र सुरू आहे. या निवारा केंद्रात कोरोना काळात सुमारे २५ बेघर नागरिक दाखल झाले होते. सध्या या ठिकाणी सुमारे १२ नागरिक वास्तव्य करीत आहेत.  महापालिकेच्या माध्यमातून घणसोली येथे निवारा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे, परंतु विविध कारणांस्तव सदर केंद्र सुरू झाले नाही तसेच कोपरखैरणे येथील केंद्राचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील बेघर नागरिकांची निवाऱ्यावाचून फरफट होत आहे.

बेघरांचे सर्वेक्षणही नाहीशहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने त्यांची संख्या माहीत असणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या माध्यमातून अद्याप सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई