शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

खारघरमध्ये अवतरले काश्मीरचे प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:00 IST

शारदा सदनमध्ये प्रदर्शन; काश्मिरी पंडित समाजाच्या पारंपरिक वस्तू, पोषाखाचे प्रदर्शन

- वैभव गायकरपनवेल : काश्मीरला दिलेला विशेष दर्जा, कलम ३७० रद्द केल्याने देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. भारताचा अविभाज्य घटक आणि पृथ्वीवरील नंदनवन असलेल्या काश्मीरबाबत प्रत्येकाला आकर्षण असून तेथील पोषाख, राहणीमान आदीचे सर्वांनाच आकर्षण असते. मूळ काश्मिरी मात्र देशातील विविध राज्यांत विखुरलेल्या काश्मिरी पंडित समाजाने केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले आहे. त्या अनुषंगाने खारघरमध्ये काश्मिरी पंडित असोसिशनच्या माध्यमातून शारदा सदन या समाजमंदिरात काश्मिरी पंडित रहिवाशांचे जीवनमान दाखविणारी आर्ट गॅलरी सध्या सर्वांचे लक्ष केंद्रित करीत आहे.काश्मीरमधील अतिरेकी कारवायांमुळे अनेकांना आपले घरे सोडावे लागले आहे. भारतभरात विविध ठिकाणी आज काश्मीर पंडित समाज वास्तव्यास आहे. खारघर शहरात सेक्टर ८ मध्ये काश्मिरी पंडित रहिवाशांचे कुलदैवत शारदादेवीच्या नावाने शारदा सदन उभारण्यात आले आहे. २०१६ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सदनाचे उद्घाटन करण्यात आले. शारदा सदनमध्ये उभारण्यात आलेली आर्ट गॅलरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काश्मिरी पंडित समाजाचे राहणीमान, रीतिरिवाज, पोषाख, मौल्यवान वस्तूचे प्रदर्शन उभारले आहे. याकरिता काश्मिरी पंडित असोसिएशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. शारदा सदनमधील दुसऱ्या मजल्यावर शारदा गॅलरी आॅफ आर्ट कल्चर उभारून त्या ठिकाणी काश्मिरी संस्कृतीचे दर्शन घडविणाºया विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये १८७० मधील विविध महत्त्वाची छायाचित्र, झेलम नदीचे फोटो, शारदापीठ (सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये आहे), काश्मीरचे पारंपरिक वाद्य ढोलक (तुंबकनर), घागर, गालिचा, काश्मीर पंडित रहिवाशांचे पारंपरिक पोषाख, फेरण आणि नारंग, फुलदाणी, काश्मीरचे पारंपरिक पेय (कावा) तयार करण्यासाठी समावार, पितळेची थाळी (ताट), चुल्हा (दान), कप (खोस), परात (पहरात), रांगोळी (व्युग) आदीसह काश्मिरी पंडित समाजाच्या दैनंदिन वापरातील पारंपरिक वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.काश्मिरी पंडित असोसिएशनचे सदस्य चांद भट प्रदर्शनाबाबत माहिती देताना म्हणाले, आमच्या असोसिएशनच्या सदस्यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांचे जीवनमान, राहणीमान, पोषाख, दैनंदिन वापरातील वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. समाजाला काश्मिरी पंडित समाजाच्या खºया खुºया संस्कृतीची ओळख पटावी, या हेतूने शारदा गॅलरी आॅफ आर्ट उभारण्यात आल्याचे या वेळी भट यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आर्ट गॅलरी पाहण्याची संधीखारघर शहरातील सेक्टर ८ मधील शारदा सदनमध्ये (काश्मिरी पंडित समाजमंदिर) उभारण्यात आलेली आर्ट गॅलरी पाहण्याची संधी असोसिएशनच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचे असोसिएशनचे सदस्य चांद भट यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370