शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानग्यांत कपात

By admin | Updated: October 23, 2015 00:17 IST

विविध प्रकारच्या बांधकाम परवानग्या घेण्यासाठी विकासकांना सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत असे. विकासकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सिडकोने सर्व बांधकाम

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईविविध प्रकारच्या बांधकाम परवानग्या घेण्यासाठी विकासकांना सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत असे. विकासकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सिडकोने सर्व बांधकाम परवानग्या आता आॅनलाइन केल्या आहे. शिवाय पूर्वी लागणाऱ्या एकूण परवानग्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने विकासकांना मोठा दिलासा मिळाला आहे.बांधकाम प्रकल्पासाठी यापूर्वी सिडकोकडून विविध प्रकारच्या १४ परवानग्या घ्याव्या लागात असे. आता त्यात कपात करून परवानग्यांची ही संख्या ४ वर आणण्यात आली आहे. शिवाय या परवानग्या देण्यासाठी सिडकोने आॅनलाइन प्लान एप्रुव्हल सिस्टीम (कोपास) ही संगणकीय कार्यप्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे विकासकांना आता घरबसल्या आॅनलाइन परवानग्या मिळविता येणार आहेत. सध्या नैना क्षेत्र वगळता सिडको नोड्समधील प्रकल्पांनाच कोपास प्रणालीद्वारे बांधकाम परवानग्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागातील लेटलतिफ कारभाराला चाप बसणार असून, विकासकांच्या वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. विविध विभागातील कारभार गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा यांनी कंबर कसली आहे. त्याअनुषंगाने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. बांधकाम परवानगीसाठी विकासकांची होणारी दमछाक, परवानगी देण्यासाठी संबंधित विभागाकडून होणाऱ्या विलंबामुळे सिडकोच्याप्रति विकासकांत कमालीची नाराजी होती. या पार्श्वभूमीवर बांधकामविषयक परवानग्या देण्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भाटिया यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यानुसार बिल्डिंग परवानगी हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त मुख्य नियोजनकार रवी कुमार व वरिष्ठ नियोजनकार मंजुला नायक या दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सिडको आॅनलाइन प्लान एप्रुव्हल सिस्टीम (कोपास) ही संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात एक कार्यशाळा घेवून विकासक आणि आर्किटेक्चर्सना या कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली होती. विकासक व आर्किटेक्चर्सनी केलेल्या सूचना व दुरुस्त्यांचा आढावा घेवून या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कोपासची कार्यप्रणालीविकासकांना नवीन किंवा जुन्या बांधकामासाठी परवानगी घेण्यासाठी आता आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. प्लान मंजुरीसाठी मान्यताप्राप्त व नोंदणीकृत आर्किटेक्चरच्या माध्यमातून आॅनलाइन प्रस्ताव सादर करायचा आहे. प्रस्तावात काही त्रुटी असल्यास संबंधित अर्जदाराला आॅनलाइनच त्याची माहिती मिळणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत संबंधितांना बांधकाम परवानगी मिळणार आहे. विशेष म्हणजे बांधकाम परवानगी मंजूर झाल्यानंतर ई-पेमेंटद्वारे विकास व इतर शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित विकासक आणि त्यांच्या आर्किटेक्चरची धावपळ कमी होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विभागातील कथित भ्रष्टाचाराला सुध्दा लगाम बसणार आहे. या प्रणालीद्वारे विकासकांना आता घरबसल्या आॅनलाइन परवानग्या मिळविता येणार आहेत.