शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणे हटवून २४ लाखांची वसुली

By admin | Updated: January 22, 2017 02:59 IST

पनवेल शहर महापालिका झाल्यापासून परिसरातील अतिक्रमणावरील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शेकडो कारवाईतून अतिक्रमणविरोधी विभागाने तब्बल २३ लाख ३७ हजार

- मयूर तांबडे,  पनवेल

पनवेल शहर महापालिका झाल्यापासून परिसरातील अतिक्रमणावरील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शेकडो कारवाईतून अतिक्रमणविरोधी विभागाने तब्बल २३ लाख ३७ हजार रुपयांचा शुल्क वसूल केला आहे. यापुढेही अतिक्र मणांवर कारवाई सुरू ठेवत त्यांच्याकडून शुल्क वसूल करण्यात येणार आहे.पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरात फेरीवाल्यांनी हैदोस घातला होता. ठिकठिकाणी अतिक्र मण करून रस्ते, फुटपाथ काबीज करण्यात आले होते. अनेक ठिकाणच्या जागा हॉटेलचालक, शिवणयंत्रचालक, दुकानदार, हातगाडी, टपरीचालक यांनी बळकावली होती. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असे. रस्त्यावरून चालताना अनेकदा नागरिकांना अपघाताचा सामनाही करावा लागत असल्याच्या घटना ताजा आहेत. दुकानांच्या समोरील सामायिक वापराच्या जागेचा (मार्जिनल स्पेस) ताबा स्वत:कडे ठेवला जात असे. सामायिक वापराच्या जागेत टेबल-खुर्च्या मांडून अनेकांनी वर्षोनुवर्षे आपला व्यवसाय थाटला होता. नगरपालिका अस्तित्वात असताना परिसरातील नागरिक व विविध संस्थांनी पालिकेवर मोर्चे काढून अतिक्रमण हटविण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, तात्पुरती कारवाई केली जात असे व दुसऱ्या दिवशी परिस्थिती पुन्हा जैसे थे व्हायची. मात्र, १ आॅक्टोबर, २०१७ रोजी पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले व आता पनवेल परिसर अतिक्रमणमुक्त पाहायला मिळेल, या आशेत पनवेलकर होते. पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सुरुवातीलाच पनवेलकरांच्या अपेक्षेला दाद देत अतिक्रमण दूर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पदपथावर व्यवसाय करणाऱ्यांचे व अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले. आयुक्तांनी कोणालाही न जुमानता कारवाई सुरू ठेवली. गेल्या तीन महिन्यांपासून पनवेल शहर, खारघर, नवीन पनवेल, कामोठे, आदी भागांतील बेकायदेशीर हजारो फलक, फ्लेक्स काढण्यात आले आहेत. तर खारघर, नवीन पनवेलमध्ये अतिक्रमणविरोधात कारवाई करत त्यांच्याकडूनअतिक्र मण शुल्क वसूल करण्यात येत असून तब्बल २३ लाख ३७ हजारांची वसुली करण्यात आली आहे.आपण व्यापाऱ्यांना अतिक्र मण काढण्यासंदर्भात रिक्षा फिरवून व अन्य मार्गाने अनेकदा आवाहन केले होते. मात्र, काहींनीअतिक्र मण काढले नाही. त्यामुळे तेथे जाऊन अतिक्र मण करणाऱ्यांना समज देऊन शुल्क वसूल केले जात आहे. पनवेल परिसरालाअतिक्र मणमुक्त करून नागरिकांना स्वच्छ, सुंदर पनवेल पाहावयास मिळणार आहे. मीडियानेही सहयोग दिला आहे. - सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल महापालिका.