शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्थगित विषयांना परस्पर मंजुरी

By admin | Updated: April 23, 2016 02:15 IST

पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही इतिवृत्तांना विरोध असताना ते मंजूर करून नगरपरिषदेतील सत्ताधारी व काही विरोधकांनी मनमानी कारभार

पनवेल : पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही इतिवृत्तांना विरोध असताना ते मंजूर करून नगरपरिषदेतील सत्ताधारी व काही विरोधकांनी मनमानी कारभार चालविला असल्याचा आरोप नगरसेवक रमेश गुडेकर यांनी केला आहे. सभेत एकूण ७८ विषय होते. त्यापैकी ७ विषयांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र हे विषय परस्पर मंजूर केल्याचा आरोपही गुडेकर यांनी केला आहे.१७ डिसेंबर २०१५ रोजीच्या इतिवृत्ताला गटनेते नगरसेवक रमेश गुडेकर यांनी विरोध दर्शविला होता. त्यावेळी शहरातील लिमये सार्वजनिक ग्रंथालयाने मागितलेल्या १ लाखाच्या अनुदानाबाबत निर्णय होणार होता. मात्र वाचनालयाने अतिक्र मण केले असून आधी अतिक्रमण हटवावे त्यानंतरच अनुदानाबाबत निर्णय घ्यावा, असे गुडेकर यांनी सुचविले होते. छत्रपती संभाजी महाराज मैदानालगत बांधलेल्या सिध्दिविनायक कॉम्प्लेक्सला पर्यायी रस्ता उपलब्ध करु न देण्याबाबत चर्चा होऊन हा विषयही तहकूब करण्यात आला. मात्र २२ मार्चच्या सर्वसाधारण सभेत हा परस्पर मंजूर करण्यात आला. अमरधाम स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ८,४९,५४८ रुपयांच्या वाढीव खर्चाबाबत चर्चा करण्यात आली आणि हा विषयही स्थगित ठेवण्यात आला. रोजबाजाराच्या सुरक्षा भिंतीच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या ७,७४,१८५ खर्चाला विरोध दर्शविण्यात आला होता. परंतु मागील इतिवृत्तामध्ये तो मंजूर केलेला आहे.शहरी भुयारी गटार योजनेसाठी वाढीव बिलाला हरकत घेण्यात आली होती. कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे हे काम लांबल्यामुळे त्याला बिलापोटी वाढीव रक्कम देण्यास विरोध होता. तसेच ठेकेदारास बिले अदा करु नयेत, तरी सुध्दा सदर ठेकेदाराला तब्बल १० कोटींचे वाढीव बिल देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.महानगर गॅस लिमिटेड यांना देण्यात आलेल्या परवानगीप्रमाणे भाडे आकारण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झालेला नाही. सदरचा विषय तहकूब ठेवण्यात आलेला असताना यामागील इतिवृत्तामध्ये ठराव करण्यात आलेला नसल्याने ही सभागृहाची दिशाभूल असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचेही गुडेकर म्हणाले.