शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणमुक्त जागांवर पुन्हा बांधकामे

By admin | Updated: September 12, 2016 03:31 IST

मागील दीड वर्षात सिडकोने कारवाई करून अतिक्रमणमुक्त केलेल्या बहुतांशी भूखंडांवर पुन्हा बेकायदा बांधकामे उभारली आहेत. कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या या भूखंडांना कुंपण

कमलाकर कांबळे ,  नवी मुंबईमागील दीड वर्षात सिडकोने कारवाई करून अतिक्रमणमुक्त केलेल्या बहुतांशी भूखंडांवर पुन्हा बेकायदा बांधकामे उभारली आहेत. कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या या भूखंडांना कुंपण घालून संरक्षित करण्यात संबधित विभाग अपयशी ठरल्याने भूमाफियांचे फावले आहे. अनेक ठिकाणी अर्धवट कारवाई केलेल्या अनधिकृत इमारती पुन्हा उभारल्याचे पाहवयास मिळते.नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे या जमिनी भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. सिडकोच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.मागील दीड दशकात या अतिक्रमणांना आळा घालण्यात सिडको सपशेल अपयशी ठरली आहे. असे असले तरी गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षात तर ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. त्यामुळे जून २0१५ नंतर आतापर्यंत नवी मुंबईसह उरण आणि पनवेल तालुक्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करून तब्बल ६४ हजार २0७ चौरस मीटर म्हणजेच १६ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. त्याअगोदर म्हणजेच २0१४ मध्ये एकूण ३१ हजार ३४५ चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण हटवून ती ताब्यात घेतली आहे. सध्याच्या मार्केट दरानुसार या संपूर्ण जागेची किंमत ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. सिडकोच्या मालकीच्या आणखी शेकडो एकर जमिनीवर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. टप्प्याटप्प्याने ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करून अतिक्रमित जागा ताब्यात घेण्याची योजना सिडकोची योजना आहे. त्यानुसार सिडकोच्या संबधित विभागाने गेल्या आठवड्यात दुसऱ्या टप्यातील १२७ अनधिकृत बांधकामांची यादी जाहिर केली आहे. असे असले तरी कारवाईनंतर मोकळे झालेले भूखंड सरंक्षित करण्यात संबधित विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्याच जागेवर पुन्हा बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. त्यामुळे कारवाईसाठी सिडकोच्या माध्यमातून केला जाणारा लाखो रूपयांचा खर्च वाया जात आहे.