शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आरसीसी चेंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:42 IST

खांदा वसाहतीतील रहिवाशांना दिलासा : डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत

कळंबोली : खांदा वसाहतीत सांडपाण्याचा निचरा करणारे बहुतांश जुने चेंबर तुटले आहेत, त्यामुळे वाहिन्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर तसेच सोसायट्याच्या आवारात साचत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्यावर मलनि:सारण पंपहाउस जवळील तुटलेले चेंबर काढून टाकून त्या ठिकाणी आरसीसी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

खांदा वसाहत सिडकोने विकसित केली. या नोडमध्ये एकूण १४ सेक्टर आहेत. नोडमधील मलमिश्रीत सांडपाणी खांदेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या पंपहाउसमध्ये येते. येथून ते कामोठे येथील मलनि:सारण केंद्राकडे पाठवले जाते. सेक्टर ४, ६, ८, ९ येथील मलमिश्रीत सांडपाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेला चेंबर जुनाट झाल्याने तुटला होता. त्यामुळे परिसरात वारंवार सांडपाणी वाहिन्या तुंबत होत्या. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोकडे केली होती. त्यानुसार सिडकोने आरसीसी चेंबर बांधण्यास सुरुवात केली असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.

बॅकवॉटरचा त्रास कमी होणारमलनि:सारण वाहिन्या तुंबल्याने हे बॅकवॉटर खांदा वसाहतीतील एका सोसायटीत येत होते. त्यामुळे तळमजल्याच्या घरातील शौचालयातून सांडपाणी वर येत होते. पाणी झिरपून भिंतींना ओल आल्याने इमारतीची दैना झाली होती. याबाबत पत्रव्यवहार केल्यावर सिडकोकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या.

२० फूट खोल आरसीसी चेंबरपंपहाउस जवळ असलेला चेंबरचे काम सिडकोने हाती घेतले आहे. हा चेंबर २० फूट खोल आहे. दोन मीटर रुंदी असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर पंपहाउसची जाळी साफ करून घेण्यात आली आहे.

पंपहाउस जवळील चेंबर जुने आणि आकाराने लहान असल्याने तुंबत होते. चेंबरमध्ये उतरून कामेही करता येत नव्हती. येत्या पावसाळ्यात रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन आरसीसी चेंबर बांधकाम करण्यात येत आहे. - व्ही. एल. कांबळी कार्यकारी अभियंता, सिडको