शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दि कराड जनता बँकेवर आरबीआयचे निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:19 IST

आरबीआयने दि कराड जनता सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. यामुळे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने

नवी मुंबई : आरबीआयने दि कराड जनता सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. यामुळे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने चिंतीत झालेल्या बँक ग्राहकांनी एपीएमसी येथील शाखेत गर्दी केली होती. या वेळी सहा महिन्यांतून फक्त एकदाच एक हजार रुपये काढता येणार असल्याची माहिती खातेधारकांना देण्यात आली.दि कराड जनता सहकारी बँकेच्या कराड येथील मुख्य शाखेतील कर्जदारांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते. यामुळे आरबीआयने दि कराड जनता सहकारी बँकेच्या सर्वच शाखांच्या व्यवहारावर निर्बंध आणले असल्याचे बँक कर्मचाºयांनी सांगितले. त्यामुळे गुरुवारी रात्री बँकेच्या सर्व शाखांना पत्र पाठवून आर्थिक व्यवहार थांबवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दि कराड जनता सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा आर्थिक व्यवहार झाला नाही. तर पैसे काढण्यासाठी अथवा खात्यात भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना धक्काच बसला. असाच प्रकार एपीएमसी दाणाबंदर येथील शाखेत गेलेल्या माथाडी कामगारांसोबत घडला. काही कामगार बँकेत गेले असता, त्यांना खात्यातून रक्कम काढता अथवा भरता येणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, यासंबंधीचे कारण त्यांनी विचारले असता, बँक कर्मचाºयांकडून ठोस उत्तर मिळाले नाही. अखेर बँकग्राहकांनी त्यांच्या इतर परिचयाच्या बँक ग्राहकांना यासंबंधीची माहिती दिली. परिणामी, दुपारपर्यंत मोठ्या संख्येने बँकेत खातेधारकांची गर्दी झाली होती; परंतु त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी बँकेचे कोणीही जबाबदार अधिकारी नव्हते. यामुळे बँकेच्या खातेधारकांमध्ये नाराजी पसरली होती. दुपारनंतर मात्र बँकेतून प्रत्येक ग्राहकाला खात्यातून एक हजार रुपये काढण्यास अनुमती असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये काढता येणार असल्याचे समजताच ग्राहकांमध्ये असंतोष पसरला. अनेकांच्या पगाराची रक्कम सदर बँक खात्यात जमा होत असून, काहींचे लाखो रुपये सदर बँकेच्या खात्यात जमा आहेत. अशा व्यक्तींपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आरबीआयचे बँकेवर आलेल्या निर्बंधासंदर्भात दोन दिवसांत बँकेची बैठक होणार असल्याचे समजते. त्यामध्ये ठरावीक शाखांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.