शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डाळी, कडधान्याचे दर पाच वर्षांत दुप्पट; जीएसटीमुळे वस्तूंचे दर पुन्हा भडकणार

By नामदेव मोरे | Updated: August 3, 2022 11:33 IST

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशभर जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पाच वर्षांमध्ये डाळी, कडधान्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इंधन दरवाढ व शासनाच्या धोरणांमुळे दरवाढ होत असून, जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे. 

महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे. उत्पन्न घटले असताना खर्चामध्ये मात्र सातत्याने वाढ होऊ लागली आहे. किमान डाळी, कडधान्य व अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. परंतु या वस्तूंवरही शासनाने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईमध्ये भर पडू लागली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबई बाजार समितीमध्ये ४० ते ४६ रुपये किलो दराने विकली जाणारी मसूरडाळ आता ८२ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे. मूगडाळ ५६ ते ६२ वरून ८५ ते १०५ रुपयांवर गेली आहे. तूरडाळ, उडीदडाळीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशीच स्थिती राहिली तर महिन्याचा घरखर्च भागविणेही मुश्कील होईल, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. 

पाच वर्षांमध्ये इंधनदरामध्ये झालेली वाढ व इतर कारणांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. शासनाने ५ टक्के जीएसटी लावल्यामुळे महागाईमध्ये अजून भर पडली आहे. - भीमजी भानुशाली, सचिव ग्रोमा  

टॅग्स :GSTजीएसटीInflationमहागाई