शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बलात्कारी आरोपीची आत्महत्या

By admin | Updated: July 12, 2015 02:46 IST

बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री खारघर येथे घडली.

नवी मुंबई : बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री खारघर येथे घडली. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. घरझडतीसाठी त्याला सोबत नेले असता पोलिसांना चकमा देऊन त्याने रो हाऊसच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.गणेश कुमावत (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर १७ वर्षीय मुलीवर बलात्काराचा गुन्हा शुक्रवारी दुपारी दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान घरझडतीसाठी पोलिसांचे एक पथक खारघर सेक्टर १२ येथील त्याच्या राहत्या घरी गेले होते. यावेळी कुमावत हा देखील त्यांच्यासोबत होता. बलात्कारावेळी वापरलेले त्याचे कपडे व इतर पुराव्यांचा पोलीस शोध घेत असतानाच त्याने पोलिसांना चकमा देऊन राहत्या रो हाऊसच्या छतावर पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचाही प्रयत्न केला. परंतु तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवर चढून त्याने उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उपचारासाठी त्याला वेळीच वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले असता रात्री ११. ३० च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुमावत मूळचा राजस्थानचा असून त्याचे कुटुंबीय गावी राहतात. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचे काम करणारा कुमावत हा अनेक वर्षांपासून तिथे एकटाच राहायला होता. खारघर परिसरात घरकामासाठी कामगार महिला पुरवणारी एक महिला या प्रकरणात सहआरोपी असल्याचे समजते. या महिलेने त्याच परिसरातील बिगारी कामगार कुटुंबातील १७ वर्षीय मुलीला ९ जुलै रोजी दुपारी घरकामाच्या बहाण्याने कुमावतच्या घरी नेले होते. या मुलीला घरात सोडल्यानंतर या महिलेने घराचे दार बाहेरून बंद केल्यानंतर कुमावतने बलात्कार केल्याची तक्रार त्या मुलीने केली होती. अधिक तपासाकरिता हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)