शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

रानसई धरणाच्या भिंतीचे प्लॅस्टर ढासळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 23:48 IST

उरण तालुक्यातील प्रकल्पांना, जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचे प्लॅस्टर ढासळू लागले आहे,

उरण : उरण तालुक्यातील प्रकल्पांना, जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचे प्लॅस्टर ढासळू लागले आहे, त्यामुळे कोकणातील तिवरे धरणाची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती धरण परिसरात ग्रामस्थांना आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.उरण तालुक्यातील प्रकल्पांना, जनतेला भेडसावणारी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून रानसई, विंधणे, दिघोडे आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकºयांच्या जमिनी १९७० मध्ये धरणासाठी संपादित करण्यात आल्या.रानसई अदिवासीवाडी जवळच्या डोंगरकपारीत १९७० ते ८० या कालावधीत ७७ फूट लांबीची (२३६.७६ मीटर) व ४६ फूट खोली (१४ मीटर) असणारी तसेच १५ दरवाजांची संख्या असणाºया पाणलोट क्षेत्रातील धरणाची संरक्षण भिंत उभारण्यात आली, त्यामुळे धरणाच्या पाण्याखाली ३५० एकर क्षेत्राचा समावेश असून दहा एम.सी.एम. १००० कोटी लीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. धरणातील (पाणलोट क्षेत्रातील) पाण्याचा पुरवठा उरण तालुक्यातील केंद्र व राज्य शासनाच्या एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस, उरण शहर व तालुक्यातील २५ गावांतील जनतेला एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सध्या रानसई धरणाच्या संरक्षण भिंतीचे प्लॅस्टर ढासळत चालले आहे.धरणाच्या संरक्षण भिंतीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी रानसई धरण परिसराला भेट द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पनवेल-उरणचे वरिष्ठ अभियंता सतीश पवार यांच्याकडे विचारणा केली असता, रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण बंधाºयाचे प्लॅस्टर पावसामुळे ढासळले असून लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर उरणचे उपअभियंता आर.डी. बिरंजे यांंनी, रानसई धरणाच्या संरक्षण बंधाºयाला कोणताही धोका नसल्याचे या वेळी सांगितले.