तळोजा : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून बिमा कॉम्प्लेक्स अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.रामा मानवर, मयूर मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश के ला. पक्षप्रवेशाआधी बाइक रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्र माप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, जगदीश गायकवाड, एकनाथ देशेकर, अरु ण भगत, अशोक मोटे, अमर पाटील, रवी पाटील, अरु ण ठाकूर, बबन बारगरजे, राजू बनकर आदी उपस्थित होते. रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांना संरक्षण देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे सांगितले. रामदास शेवाळे यांचे त्यांनी भाजपामध्ये स्वागत केले. सिडकोच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर योग्य उत्तर शोधून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. विकासाचा शब्द रामशेठ ठाकूर यांनी दिला असून आ. प्रशांत ठाकूर ज्या रस्त्याने चाललेत त्याच रस्त्यावर चालण्याचा निर्धार केला आहे. माझा कळंबोलीचा विकासप्रस्ताव तयार असून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे रामदास शेवाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
रामदास शेवाळे यांचा भाजपात प्रवेश
By admin | Updated: April 20, 2017 03:26 IST