शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, एकतेचे प्रतीक उभे राहणार आहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:34 IST

राघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन : श्रीराम मंदिर निर्माण अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : ‘श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन करण्याची वेळ यावी, ही आनंददायी की खेदाची बाब आहे, हे कळत नाही. देशात लाखो मंदिरे उभी आहेत; मग हे मंदिर कशासाठी? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. याबाबत सांगायचे तर श्रीराम आपल्या कणाकणांत आहेत. ईश्वराचे एक मूळ स्थान आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. हा त्याचा गर्भितार्थ आहे. पाचशे वर्षे लागलेला कलंक आपल्याला पुसायचा आहे. यासाठी अनेकांचे बलिदान आहे. राममंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे, एकतेचे, संस्काराचे प्रतीक उभे राहणार आहे.' असे स्पष्ट प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी शुक्रवारी येथे केले.

अयोध्येत श्रीरामांचे भव्य असे मंदिर उभे राहत आहे आणि याकरिता सर्व देशभर श्रीराम मंदिर निर्माण अभियान सुरू आहे. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अभियान राबविले जाणार आहे. त्याची सुरुवात म्हणून विठ्ठलनगरमधील सावली सोसायटीमध्ये राममंदिर निर्माण संपर्क अभियान कर्जत तालुक्याच्या वतीने संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील अभियान कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे, तर प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुका संघचालक विनायक चितळे, तालुका अभियानप्रमुख दिनेश रणदिवे व्यासपीठावर उपस्थित होते. जैन श्वेतांबर समाजाच्या वतीने २१ हजार रुपयांचा धनादेश आणि सतीश दत्तात्रेय श्रीखंडे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई