शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत नगराध्यक्षपदी रजनी गायकवाड विराजमान

By admin | Updated: August 10, 2016 03:21 IST

नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०१४ मध्ये झाली होती. त्यावेळी सतरापैकी दहा जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली निर्विवाद सत्ता आणली आणि युतीच्या

कर्जत : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०१४ मध्ये झाली होती. त्यावेळी सतरापैकी दहा जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली निर्विवाद सत्ता आणली आणि युतीच्या उमेदवारांचा पराभव करून नगराध्यक्षपदी राजेश लाड तर उपनगराध्यक्षपदी लालधारी पाल यांची निवड झाली. अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर आज पुन्हा निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या रजनी गायकवाड नगराध्यक्षपदी तर अर्चना बैलमारे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्ताने कर्जत नगरपरिषदेमध्ये खऱ्या अर्थाने महिलाराज आले असून कर्जतच्या इतिहासात नगराध्यक्षपदी प्रथमच एक दलित महिला विराजमान झाली आहे.कर्जतचे उपविभागीय अधिकारी दत्ता भडकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मावळते नगराध्यक्ष राजेश लाड, मावळत्या नगराध्यक्षा पुष्पा दगडे, रजनी गायकवाड, अर्चना बैलमारे, लालधारी पाल, उमेश गायकवाड, मिलिंद चिखलकर, शीतल लाड, अश्विनी दिघे, सई वारे, नितीन सावंत, संतोष पाटील, सुवर्णा जोशी आदी उपस्थित होते. नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दहा, शिवसेना सहा व भाजपा दोन असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेचे आरक्षण असल्याने रजनी रामदास गायकवाड या एकमेव उमेदवार असल्याने त्यांनी अर्ज दाखल केला. एकच अर्ज असल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना अरु ण बैलमारे यांनी व शिवसेनेतर्फे मुकेश राजाराम पाटील यांचे अर्ज आले होते. मुदतीत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अर्चना बैलमारे यांना दहा तर मुकेश पाटील यांना सहा मते मिळाली. त्यामुळे अर्चना बैलमारे उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.या प्रसंगी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष खवळे, आरपीआय स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव, माजी नगराध्यक्ष शरद लाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)