नवी मुंबई : आंतरशालेय फुटबॉल एमएसएसए लीगच्या (१४ वर्षांखालील मुली) विभागीय स्पर्धेत एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूलच्या राजलक्ष्मी पाटील हिने चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. या स्पर्धेत तिने चक्क सहा गोल करून आपल्या संघाला अव्वल स्थान प्राप्त करून दिले आहे. राजलक्ष्मी ही नेरूळ येथील डी. वाय. पाटील क्रीडा संकुलाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांची कन्या आहे. राजलक्ष्मी हिने जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल व सेंट एन्नेस संघाच्या विरुद्ध खेळताना अनुक्रमे दोन आणि एक असे गोल केले. तर जमनाबाई नर्सी स्कूल आणि सेंट लॉरेन्सच्या विरोधात खेळताना अनुक्रमे दोन आणि एक असे गोल केले. या चार सामन्यांत तिने केलेल्या सहा गोलमुळे ही स्प्रिंग इंटरनॅशनल शाळेच्या संघाने बी गटात अव्वल स्थान पटकावले आहे. राजलक्ष्मी हिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेला हे यश प्राप्त झाले असले, तरी संघातील सर्व खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षकांचे हे यश असल्याचे तिने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
राजलक्ष्मी पाटील हिची चमकदार कामगिरी
By admin | Updated: December 2, 2015 00:45 IST