शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रायगडावर शिवगर्जनेचा जयघोष

By admin | Updated: January 22, 2016 02:20 IST

रायगड महोत्सवानिमित्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. ही शिवसृष्टी २४ जानेवारीपर्र्यंत सर्वांना पाहता येणार आहे.

रायगड महोत्सवानिमित्त रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. ही शिवसृष्टी २४ जानेवारीपर्र्यंत सर्वांना पाहता येणार आहे. येथे शिवकालीन इतिहासाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. या रायगड महोत्सवाचे उद्घाटन गुरु वारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी महाराजांची हुबेहूब वेशभूषा अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत शिवकालीन इतिहास कथन करणारे कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहेत. येथे रविवारपर्यंत महादरवाजा, सभामंडप, राणीवसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधी स्थळ यांची इतिहासकालीन सजावट करण्यात येणार आहे. शाहीर, वासुदेव, भारु डकर आणि गोंधळी शिवस्तुती सादर करणार आहेत.रायगडावर अवतरला शिवशाहीचा थाट१महाड : जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय... च्या जयघोषात ढोल-ताशांच्या निनादात किल्ले रायगडावर शिवशाही अवतरल्याचा थाट गुरु वारी पाहायला मिळाला. राजदरबारात शिवकालीन पेहरावात सादर करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या जिवंत देखाव्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी गडावर शिवकालीन थाटात निघालेल्या मिरवणुकीमध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, विविध लोककलांचे दर्शनही घडले. २गडावर गुरु वारी संपन्न झालेल्या या सोहळ्याला शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. गडावरील सर्व वास्तू फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्या होत्या. गडाच्या पायथ्याशी पाचाड गावात जिजामाता वाड्यालगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेल्या शिवसृष्टी शिवकालीन जीवनशैली साकारण्यात आली असून गडावरील नगारखाना, मेघडंबरी आदींसह थोर संतांचे भव्य पुतळे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे. शिवसृष्टीमुळे येथे इतिहास जागा झाला आहे.३शिवकाळातील शस्त्रे, तलवारी, ढाल, दांडपट्टा आदी येथे पाहण्यासाठी लावले आहेत. ही शिवसृष्टी पर्यटकांना नक्कीच भुरळ घालेल, यात शंका नाही. हुबेहूब गाव, राजवाडा येथे साकारला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच ठिकठिकाणी आरोग्यपथके तैनात होती. नातेखिंड ते गडापर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. वाहन पार्र्किंगच्या सुविधेमुळे वाहतुकीची कोंडी मात्र झाली नाही.