शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पावसाचा फटका; ४० टन भाजीपाल्याची विक्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:08 IST

मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही. धान्य व फळ मार्केटमध्येही ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये सोमवारी १७३४ वाहनांमधून कृषी माल विक्रीला आला होता. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्यामुळे फक्त १२६० गाड्यांची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५५० वाहनांमधून तब्बल १६४ टन कृषी माल विक्रीसाठी आला होता. नाशिक, पुणे, सातारा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातूनही भाजीपाला विक्रीसाठी आला होता. भिजल्यामुळे जवळपास १० टन माल फेकून द्यावा लागला. मुंबईमधून किरकोळ विक्रेते माल खरेदी करण्यासाठी आलेच नाहीत. यामुळे तब्बल २५ टक्के मालाची विक्रीच झालेली नाही. मार्केटमध्ये ४० टनपेक्षा जास्त माल दिवसभर पडून होता. बुधवारी कमी दराने या मालाची विक्री करावी लागण्याची शक्यता आहे. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भाजीपाला मार्केटबरोबर धान्य मार्केटमधील व्यवहारावरही परिणाम झाला आहे. सोमवारी मार्केटमध्ये ४१९ वाहनांची आवक झाली होती. मंगळवारी फक्त २०८ वाहनांमधून कृषी मालाची आवक झाली आहे. मसाला मार्केटमध्येही ५० टक्के आवक कमी झाली आहे. आवक कमी असूनही ग्राहकच नसल्यामुळे कृषी मालाची विक्री होऊ शकली नाही. बाजारभावामध्ये फरक पडला नसला तरी पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील आठवड्यात भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.पावसामुळे मुंबई व उपनगरांमधून किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी पुरेशा प्रमाणात आले नाहीत. यामुळे २५ टक्के मालाची विक्री होऊ शकली नाही.- शंकर पिंगळे,व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसीकांदा - बटाटा मार्केटमध्येही आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. सोमवारी २५९ वाहनांची आवक झाली होती. मुसळधार पावसामुळे मंगळवारी फक्त १७४ वाहनांमधून कांदा, बटाटा व लसूणची आवक झाली आहे.- सुरेश शिंदे,व्यापारी, कांदा मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती