शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे नाका येथील रेल्वे पादचारी पूल : प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:33 IST

तुर्भे नाका येथे रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी पादचारी पूल मंजूर होऊनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जीव मुठीत धरून पादचाºयांना रूळ ओलांडावा लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

नवी मुंबई : तुर्भे नाका येथे रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी पादचारी पूल मंजूर होऊनही प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जीव मुठीत धरून पादचाºयांना रूळ ओलांडावा लागत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.तुर्भे नाका येथे ठाणे-बेलापूर मार्गावर पादचा-यांकडून रस्ता ओलांडण्याच्या प्रकारात अपघात घडत होते. यामुळे त्या ठिकाणी पादचारी पूल बांधून दुभाजकावर लोखंडी तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावरील अपघात थांबले असले तरीही त्या ठिकाणी रेल्वे रुळावर मात्र अपघातांची मालिका सुरूच आहे. जनता मार्केटच्या दिशेला जाण्यासाठी रेल्वे रुळावरही पुलाची आवश्यकता आहे. त्याकरिता खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यास मंजुरी मिळवली. जानेवारीमध्ये कार्यादेश मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार होती; परंतु ठरवलेली तारीख सातत्याने पुढे ढकलली जात आहे. यामुळे अद्यापपर्यंत प्रत्यक्षात पादचारी पूल बांधणीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे तिथे अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरत असल्याने रेल्वे रुळाच्या दुतर्फा फेरीवाले बसतात. यासाठी काहींनी रुळाभोवती बांधलेली भिंत पाडून पाऊलवाट तयार केलेली आहे. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पादचाºयांची ये-जा होत असल्याने बेसावध अवस्थेत त्यांना रेल्वेची धडक लागून अपघात घडत आहेत. अशाच प्रकारातून रविवारी एका व्यक्तीला रेल्वेची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सातत्याने घडणाºया अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी लवकरात लवकर पादचारी पूल उभारला जाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.या पादचारी पुलासाठी पालिका निधी देणार असून, पुलाचे बांधकाम रेल्वेमार्फत केले जाणार आहे. त्यानुसार पालिका व रेल्वे अधिकाºयांनी प्रत्यक्षात ठिकाणाची पाहणीदेखील केलेली आहे.या वेळी ज्या ठिकाणी पुलाचा पिलर ज्या ठिकाणी उभारला जाणार होता, त्या ठिकाणी भूमिगत गॅसवाहिनी असल्याचे समोर आले. यामुळे पिलर उभारण्यासाठी अधिकाºयांना नव्या जागेचा शोध घेण्यास अधिक कालावधी लागत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, या कामासंदर्भात दोन्ही प्रशासनाच्या अधिकाºयांकडे चौकशी केल्यास एक-दुसºयावर टोलवा टोलवी होत असल्याचा आरोप शाखाप्रमुख महेश कोटीवाले यांनी केला आहे. तर केवळ श्रेय लाटण्याच्या उद्देशाने काही व्यक्तींकडून पालिका अधिकाºयांना हाताशी धरून कामात दिरंगाई केली जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे.ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेला पादचारी पुलाचे दुसरे टोल रेल्वे रुळाच्या दुसºया बाजूला घेणे आवश्यक होते. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे तसे झाले नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी पूल वापरणाºया पादचाºयांना जनता मार्केटच्या दिशेला जाण्यासाठी रूळ ओलांडावा लागत आहे. त्यामुळे घडणाºया दुर्घटनांना नियोजनाचा अभाव हादेखील कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई