शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

फेरीवाल्यांनी बळकावला रेल्वेचा पादचारी पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:25 IST

तुर्भेतील प्रकार; आठवड्यापूर्वी झाले उद्घाटन

नवी मुंबई : रेल्वेरूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी तुर्भेत उभारण्यात आलेला पादचारी पूल आठवड्यातच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी बनवलेल्या या पुलावर रविवारचा आठवडे बाजार बसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे हा पूल पादचाºयांच्या की फेरीवाल्यांच्या सोयीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.तुर्भे नाका व जनता मार्केट परिसराला जोडणाºया रेल्वेरुळावरील पादचारी पुलाचे गत आठवड्यात उद्घाटन झाले. त्या ठिकाणी पादचाºयांकडून रूळ ओलांडला जात असल्याने अपघाताच्या घटना घडत होत्या. त्याला आळा घालण्यासाठी पालिकेच्या सुमारे सहा कोटी ८४ लाख रुपये खर्चातून हा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना एका विभागातून दुसºया विभागात जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडून करावा लागणारा मृत्यूच्या दाढेखालील प्रवास टळला आहे. मात्र, हा पूल पादचाºयांसाठी वरदान ठरत असतानाच त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. जनता मार्केट परिसरात प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरत असतो. त्यापैकी काही फेरीवाल्यांनी या नव्या पुलावरच बाजार भरवल्याचे पुलाच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्याच रविवारी पाहायला मिळाले. सदर पुलाच्या उद्घाटनावेळीच त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होण्याची शक्यता पालिका अधिकाºयांनी वर्तवली होती. या नव्या पुलाला जोडून असलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलावरही फेरीवाल्यांनी यापूर्वी कब्जा मिळवला होता. मात्र, त्यांच्यामुळे पादचाºयांना अडचण होऊ लागल्याने नागरिकांकडूनहोणाºया विरोधामुळे ते त्या ठिकाणी फार काळ टिकू शकले नाहीत. या पूर्वानुभवावरून रेल्वेरुळावरील नवा पादचारी पूलही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडणार नाही याची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित सर्वच प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा होताना दिसत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे यांनी केला आहे. परिणामी, पादचाºयांना पुलावरून चालण्यात अडथळा निर्माण होत आहे. तर या फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न झाल्यास त्यांना अर्थपूर्ण राजाश्रय मिळून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :hawkersफेरीवाले