शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यविक्री बंदीकरिता रायगड पोलीस सज्ज

By admin | Updated: April 1, 2017 23:45 IST

राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील मद्यविक्री बंदीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहे.

अलिबाग : राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील मद्यविक्री बंदीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याकरिता रायगड पोलीस सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा पोलीस क्षेत्रातील अवैध दारूनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे. अवैध दारूचे समूळ निर्मूलन करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे. पारसकर यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊ न दारूबंदीच्या विशेष अभियानाची माहिती दिली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील व पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे उपस्थित होते.रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील अवैध दारूनिर्मिती आणि त्याची विक्री यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस कारवाई झाली तरी आरोपी सुटल्यानंतर अवैध दारूच्या व्यवसाय अधिक जोमाने सुरू करतात. समुद्री खाड्या, जंगलभागात दारूनिर्मिती, वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. लोकसहभाग वाढल्यास ही अवैध दारू बंद होऊ शकते, असा विश्वास पोलीस अधीक्षक पारसकर यांनी व्यक्त केला असून अवैध दारूनिर्मिती व विक्रीची माहिती देण्याचे जनतेला आवाहन केले आहे. अवैध दारूनिर्मिती आणि विक्रीविरोधात विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे. या विशेष अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आपल्या भागात सुरू असलेली अवैध दारूनिर्मिती, विक्री व वाहतूक याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी, अथवा पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क करून व्हॉट्स अ‍ॅप, एसएमएसद्वारे माहिती द्यावी. स्थानिक पोलीस त्यावर तातडीने कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान स्थानिक पोलीस कारवाई करीत नसतील, तर त्यांच्यावरही आपण करवाई करू असा इशारा देऊन, अवैध दारूबद्दल माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त राहील, असे त्यांनी सांगितले. अवैध दारू व्यवसायामध्ये जर एखादा आरोपी वारंवार सहभागी असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. जिल्हातील अवैध दारू विरोधात या अभियानात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी अखेरीस केले आहे. (विशेष प्रतिनिधी)