शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

अमेरिकन नागरिकांना लुटणारे रॅकेट उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:28 IST

इंटरनेटद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना कॉल करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लुटणारे रॅकेट उघड झाले आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : इंटरनेटद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना कॉल करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लुटणारे रॅकेट उघड झाले आहे. त्यांच्याकडून सानपाडा येथे भाडोत्री जागेत अनेक दिवसांपासून कॉलसेंटर चालवले जात होते. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्या ठिकाणी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकाने यापूर्वी कॉलसेंटरमध्ये काम केले असल्याने त्याच्याकडे अमेरिकेतील नागरिकांचे फोन नंबर होते.सानपाडा सेक्टर ११ येथील एलोरा फिस्टा टॉवरमध्ये भाडोत्री जागेत कॉन्सीअर्ज हेल्पकेअर सोल्युशन सर्व्हिसेस नावाने हे कॉलसेंटर चालवले जात होते. त्या ठिकाणी १५ ते २० मुलांना प्रशिक्षण देऊन नोकरीवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांना संपूर्ण प्रकारापासून अलिप्त ठेवून केवळ फोन जोडून देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ट्रॉम्बे येथे राहणाऱ्या मन्सुर अली कासीम शेख (२९) याच्याकडून हे कॉलसेंटर चालवले जात होते. अमेरिका व भारतातील वेळेच्या तफावतेनुसार केवळ रात्रीच्या वेळीच हे कॉलसेंटर चालवले जायचे. त्या ठिकाणावरून इंटरनेटद्वारे अमेरिकेतील रहिवाशांना फोन करून त्यांच्या संगणक अथवा लॅपटॉपमध्ये वायरस असल्याची माहिती दिली जायची. त्यानंतर तो वायरस काढण्याच्या बहाण्याने संगणकाचा रिमोट अ‍ॅक्सेस स्वत:कडे घेतल्यानंतर त्यातली महत्त्वपूर्ण माहिती चोरायचे. अथवा अमली पदार्थाच्या तष्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवली जायची, ती टाळण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात होती. त्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त संजय कुमार, गुन्हे शाखा उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक राणी काळे, नीलेश तांबे, राजेश गज्जल, सहायक उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार सतीश सरफरे, ज्ञानेश्वर बनकर, पोपट पावरा आदीचा समावेश होता. त्यांनी कॉलसेंटरमधील हालचालीवर लक्ष ठेवून बुधवारी रात्री छापा टाकला असता, या बनावट कॉलसेंटरचा भांडाफोड झाला. दोन दिवसाच्या सखोल तपासांती सानपाडा पोलीसठाण्यात या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मन्सुर शेख याच्यासह मोहम्मद साजीद मोहम्मद जुनेद शेख (२९), मोहम्मद जहिर साईमोहम्मद शेख (३२), मोहम्मद फरहान मोहम्मद तसदिक शेख (२८) व मुर्तुझा अख्तर मोटारवाला (३०) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी मुर्तझा मोटारवाला हा यापूर्वी अमेरिकेत एका कॉलसेंटरमध्ये कामाला होता. यादरम्यान त्याने अमेरिकन व्यक्तींच्या मोबाइल नंबरचा डेटा साठवला होता. त्याच आधारे अमेरिकन रहिवाशांना लुटण्यासाठी सानपाडा येथे बनावट कॉलसेंटर सुरू करण्यात आले होते. त्यांनी आजवर किती जणांना लुटले याचा तपास सुरू आहे.।अमेरिकन नागरिकांचा डेटाअटक केलेल्यांपैकी मुर्तुझा मोटारवाला याने यापूर्वी कॉलसेंटरमध्ये काम केले आहे. यादरम्यान, त्याने अमेरिकन नागरिकांच्या मोबाइल नंबरची माहिती साठवली होती. त्याद्वारे सानपाडा येथील बनावट कॉलसेंटरमधून इंटरनेटद्वारे संबंधितांना कॉल करून संगणकात व्हायरस असल्याचे सांगून फसवले जात होते.।संगणकासह इतर साहित्य जप्तकॉलसेंटरवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तिथले संगणक जप्त केले आहेत, तर पुढील तपासाकरिता महत्त्वाचा सुगावा ठरतील, अशा १७ हार्ड डिस्क, दोन लॅपटॉप, सहा मोबाइल फोन व रोख रक्कम असा दोन लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी आजवर किती जणांना लुटले आहे, याचा उलगडा जप्त केलेल्या हार्ड डिस्कमधून होऊ शकतो.।रविवारपर्यंतची कोठडीबनावट कॉलसेंटर चालवून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान पोलिसांच्या चौकशीत त्यांच्याकडून अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे..सोशल सिक्युरिटी कार्डची भीतीयूएस सरकारकडून तिथल्या नागरिकांना सोशल सिक्युरिटी कार्ड दिले जाते. त्याद्वारे सरकारकडे संबंधित व्यक्तीच्या आजवर कमाईची नोंद तसेच कामकाजाची नोंद ठेवली जाते. याचा फायदा संबंधिताला निवृत्तीनंतर लाभासाठी अथवा अपंगत्व आल्यास सवलत मिळवण्यासाठी होतो. मात्र, एखाद्या गुन्ह्यात त्या व्यक्तीचा संबंध आढळून आल्यास त्यांचे हे कार्ड रद्द होऊ शकते. याचाच फायदा घेऊन अमेरिकन नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्यांना लुटले जात होते.