शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या बिगारी कामगाराला अटक; साथीदाराचा शोध सुरु

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 20, 2024 18:53 IST

पाच गुन्ह्यातील ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई : गोठीवली गाव परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. अटक केलेला गुन्हेगार हा बिगारी कामगार असून कामाच्या निमित्ताने परिसराची रेकी करायचा. त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

गोठीवली गाव परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी निरीक्षक उन्मेष थिटे, सहायक निरीक्षक दीपक खरात, हवालदार निलेश भोसले, दर्शन कटके, गणेश वीर, मयूर सोनवणे, यादवराव घुले आदींचे पथक केले होते. त्यांनी घटनास्थळ परिसराची पाहणी करून व परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयित गुन्हेगाराची माहिती मिळवली होती. त्याद्वारे संशयित वर्णनाचा तरुण कोपर खैरणे सेक्टर १९ परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री त्याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

अधिक चौकशीत त्याचे नाव नूरआलम शेख (२५) असून तो मजुरी कामगार असल्याचे समोर आले. तर गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. शेख हा मूळचा पश्चिम बंगालचा असून त्याच्यावर यापूर्वी बोरिवली, बांद्रा व विष्णूनगर येथे गुन्हे दाखल आहेत. रबाळे परिसरात देखील त्याने केलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. तर त्याच्याकडे ८ लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने मिळून आले आहेत. हे दागिने घेऊन तो पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकली. यामुळे चोरीचा मुद्देमाल मिळू शकला आहे. मिळेल ते मजुरी काम करत असताना परिसरातील बंद घरांची रेकी करून तो त्याठिकाणी घरफोडी करायचा.