शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील सर्व्हिस सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याबाबत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 01:44 IST

अधिकारी सुस्त : जलवाहिन्यांमधून चोरले जाते आहे पाणी 

n  सूर्यकांत वाघमारेn  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात गॅरेज व सर्व्हिस सेंटर चालवले जात आहेत. त्या ठिकाणी वापरले जाणारे पाणी येते कुठून हा संशोधनाचा विषय बनला आहे. बहुतांश सेंटरमध्ये जलवाहिनीच्या चोरीच्या पाण्याचा वापर होत असल्याने सर्वच ठिकाणांची पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात प्रत्येक नोडमध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे सर्व्हिस सेंटर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहने धुण्याचे काम होत आहे. यासाठी शंभर ते दीडशे रुपये शुल्क आकारले जात आहे. यानुसार एका वाहनामागे शेकडो लीटर पाण्याचा वापर होत असल्याने प्रत्येक सेंटरमध्ये दिवसाला लाखो लीटर पाण्याचा वापर होत आहे. त्यांना हे पाणी येतेय कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात चालत असलेले बहुतांश सर्व्हिस सेंटर मोरबेच्या जलवाहिन्यांच्या जळपासच्या परिसरात आहेत. त्यापैकी अनेकांकडून जलवाहिनीचे पाणी चोरले जात असल्याचा दाट संशय आहे. तर नोडमध्ये चालणारे सेंटर चालकांनी जवळपासच्या जलवाहिनीला पाइप जोडून सेंटरपर्यंत पाणी वाहून नेल्याचीही शक्यता आहे. अनेक सेंटरच्या समोर रस्ते खोदून हे नळ जोडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी टाक्या उभारून त्यात टँकरद्वारे पाणी साठवले जात असल्याचेही भासवले जात आहे. मात्र उघडपणे हे सर्व्हिस सेंटर चालवले जात असतानाही प्रशासनाकडून तिथली झाडाझडती का घेतली जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. 

धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजवाहने धुतल्यानंतरचे सांडपाणी हे जवळपासच्या नाल्यात व गटारात सोडले जात आहे. वाहने धुण्यासाठी डिझेलचा वापर होत असल्याने सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात तेलाचे प्रमाण असते. नाल्याद्वारे हेच सांडपाणी नाल्यांमधून खाडीत मिसळत आहे. यामुळेच अनेक ठिकाणी पाण्यावर तेलाचे तवंग दिसून मासे मरत असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस सेंटरच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.