शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: January 3, 2017 05:53 IST

पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या पालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या महसुली गावात एकूण ५१ रायगड जिल्हा परिषदेच्या

वैभव गायकर, पनवेलपनवेल महानगरपालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या पालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या महसुली गावात एकूण ५१ रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. लवकरच या शाळा महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येणार असून हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र सद्यस्थितीत शाळांना अनेक अडचणी भेडसावत असून त्या पूर्ण होण्यात विलंब लागत असल्याने विद्यार्थी-शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. खारघरमधील बेलपाडा गावात रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा मोडकळीस आल्यामुळे ती खासगी इमारतीत भाड्याच्या जागेत भरवली जात असून शाळेचे भाडे खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने भरले जात होते. मात्र खारघर ग्रामपंचायतीचा पनवेल महापालिकेत समावेश झाल्यानंतर ही शाळा भरणे बंद झाले आहे. सद्यस्थितीत ही शाळा समाजमंदिरात किंवा मंदिरात भरत आहे. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या महापालिका हद्दीतील शाळांचे हस्तांतरण पूर्ण होत नाही तोपर्यंत या शाळांची दुरुस्ती होऊ शकत नाही. याठिकाणचे वीज बिल भरण्यासही अडचणी येत आहे. या सर्वाचा परिणाम शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबरच शैक्षणिक दर्जावरही पडू लागला आहे. पनवेल महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांमध्ये एकूण साडेसहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जवळजवळ २७५ शिक्षक याठिकाणी कार्यरत आहेत. बेलपाडा शाळेची झालेली दुरवस्था पाहता नुकतीच पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी नुकतीच गटशिक्षण अधिकारी माधुरी कुबेरकर यांची भेट घेतली. लवकरात लवकर ही शाळा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. यावेळी दरमहिन्याला २० हजार रुपये इतके भाडे शिक्षण विभाग देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. शाळेचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. ५१ शाळांचे सर्वेक्षण करून सर्वप्रथम याठिकाणच्या नादुरुस्त शाळा दुरु स्त केल्या पाहिजेत, अन्यथा विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. भविष्यात जिल्हा परिषद अथवा महानगरपालिकेच्या कचाट्यात अडकून विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.