शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:20 IST

न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली; पनवेल महापालिकेकडून ठोस धोरण निश्चितीची गरज

- वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरासह पालिका हद्दीतील उड्डाणपूल सध्या अति क्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. बहुतांश उड्डाणपुलाखाली अनधिकृत भंगारवाले, बेकायदा वाहनतळ तसेच अनधिकृत गॅरजेवाल्यांनी दुकाने थाटल्याचे पहायला मिळत आहे. उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना देखील अशाप्रकारे नियमांची पायमल्ली सुरू असून त्यामुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.खारघर, कामोठे, खांदा वसाहत, पनवेल, नवीन पनवेल, नावडे फाटा या सर्वच ठिकाणी अनधिकृत दुकानांनी उड्डाणपुलाखाली ठाण मांडले आहे. भंगारवाले, झोपड्या, बेकायदा वाहनतळ आदींसाठी पुलांचा आधार घेतला जात आहे. उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित करण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र पनवेल महापालिकेकडून कोणतेही ठोस धोरण ठरवण्यात आलेले नाही. वाहतूक पोलीसही इतर प्राधिकरणाकडे बोट दाखवत असल्याने हा विषय ज्वलंत होत आहे.सिडको, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या अखत्यारीत हे उड्डाणपूल येतात. सर्वच उड्डाणपुलाच्या खाली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही, हेही खरे आहे.उड्डाणपुलाखाली अनधिकृत झोपड्या, भंगाराचे गोदाम, गॅरेज सुरू असून वीजपुरवठा देखील करण्यात आला आहे. अडगळीच्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे पुलालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे सिडको, महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या ठोस कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.पनवेल पालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, नावडे फाटा, खांदेश्वर, नवीन पनवेल उड्डाणपूल, पनवेल उन्नत उड्डाणपूल, खांदा वसाहत रेल्वे क्र ॉसिंग उड्डाणपूल आदी ठिकाणी भंगारवाले, दुकाने, गॅरेज सुरू करण्यात आले आहेत. वाहनतळासाठीही पुलाखालील जागेचा उपयोग करण्यात येत असल्याने पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.पनवेल महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणात उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित करण्यात आला होता. यावेळी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी याठिकाणी आकर्षक चित्रे काढून जनजागृतीपर संदेश दिले होते. याशिवाय काही पुलांखाली वृक्षारोपण करण्यात आले होते.अनधिकृत पार्किंग आमच्या निदर्शनास आल्यास वेळोवेळी कारवाई करत असतो. यासंदर्भात पालिका तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला आहे.- अभिजित मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल वाहतूक शाखा

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा