शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 01:19 IST

ठाणे - बेलापूर रोडवर दिघा येथे अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम आठ वर्षांपासून रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्काळ अतिक्रमण हटवून रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर रोडवर दिघा येथे अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम आठ वर्षांपासून रखडले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्काळ अतिक्रमण हटवून रुंदीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या कडक भूमिकेमुळे स्थानिकांनी स्वत:च अतिक्रमण हटविले आहे. आठ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आठ दिवसांमध्ये सोडविल्यामुळे शहरवासीयांनी मुंढे यांचे आभार मानले आहेत. तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हातामध्ये घेतल्यापासून कामांचा झपाटा सुरू केला आहे. आतापर्यंत सर्वात दुर्लक्षित राहिलेल्या दिघा विभागापासून समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. दिघा विभागा कार्यालयास भेट दिल्यानंतर कामात हलगर्जी केलेल्या एक कर्मचाऱ्याला निलंबित केल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागेल व इतर तांत्रिक अडचणी सांगितल्यानंतर आठ दिवसामध्ये रस्ता मोकळा झाला पाहिजे असे स्पष्ट केले. आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनाने १६ मे रोजी येथील ४२ अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी कारवाई केली जाणार होती. परंतु आयुक्तांच्या भूमिकेमुळे हादरलेल्या रहिवाशांनी व दुकानमालकांनी शुक्रवारी स्वत:च जेसीबी लावून येथील अतिक्रमणे हटविली आहेत. पालिका १६ मे रोजी अतिक्रमण हटविणार होते. परंतु स्थानिकांनी १३ मे रोजी स्वत:च अतिक्रमण काढल्यामुळे आता रुंदीकरणाचे प्रश्न मार्गी लागला आहे. मुंढे यांच्या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे. विकासकामांचा धडाका असाच सुरू राहावा अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.1सायन - पनवेल महामार्गानंतर सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या रोडमध्ये ठाणे - बेलापूर रोडचा समावेश होतो. पूर्वी विटावा ते महापे जंक्शनपर्यंतचा रस्ता औद्योगिक वसाहत व महापे जंक्शन ते तुर्भेपर्यंतचा रस्ता सिडकोच्या अखत्यारीत होता. 2दोन यंत्रणांमध्ये विभागल्यामुळे रोडवरील खड्डे बुजविण्याचे कामही केले जात नव्हते. २००५ मध्ये १५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी दोन ते तीन तास वाहतूक कोंडीमध्ये रखडावे लागत होते. 3नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने स्वखर्चाने हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी केंद्र शासनाच्या एएसआयडीई योजनेमधूनही निधी प्राप्त झाला होता.