शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील कर्मचारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:22 IST

नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून बगल; राखीव आरक्षणाची मागणी

नवी मुंबई : पालिकेकडून आरोग्य विभागासाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिकांना डावलून वशिल्याची भरती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून होत असलेल्या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पालिकेच्या आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या जागा भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून आजवर ठोस प्रयत्न झालेले नाहीत. परंतु कोरोनामुळे आरोग्य विभागातले मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पालिकेकडून कंत्राटी स्वरूपात डॉक्टर, परिचारिका व इतर सहायक कर्मचारी भरती सु्न३ करण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे ५०० जणांना पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी मिळणार आहे. परंतु पालिकेत कंत्राटी स्वरूपात भरती झालेल्यांना कायम कामगारांप्रमाणेच वेतन व सुविधा दिल्या जातात. त्यामुळे आरोग्य विभागासाठी होत असलेली भरती प्रक्रिया शासकीय नोकर भरतीच ठरत आहे. असे असतानाही प्रशासनाकडून सदर भरती प्रक्रियेसाठी शासनाचे नियम डावलून आरक्षण वगळले आहे.रिक्त पदांनुसार प्रत्येक प्रवर्गाला राखीव जागा देणे आवश्यक आहे. असे झाल्यास गरजवंतांना नोकरीची संधी मिळू शकते. परंतु कंत्राटी भरतीच्या नावाखाली प्रशासनाकडून या बाबींना बगल देण्यात आली आहे.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी सदर भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करून नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.सत्ताधारी, विरोधकांचे मौनपालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटी कायमस्वरूपी भरती प्रक्रियेला लागू होणार आहेत. त्यामुळे पूर्वनियोजित पद्धतीने आरक्षण डावलून वशिल्याच्या भरतीसाठी खटाटोप सुरू असल्याचीही शक्यता अभयचंद्र सावंत यांनी वर्तवली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होत असतानाही सत्ताधारी व विरोधक यांच्या मौनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका