कांता हाबळे/लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : नेरळ शहरात शनिवारी सकाळी अंबिकानाका येथील एका दुकानाची भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले. नेरळ शहरात अनेक धोकादायक इमारती असल्याने रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेरळ शहरात १०० वर्षे जुनी असलेल्या गणेश कटारिया यांच्या दुकानाची भिंत शनिवारी सकाळी कोसळली. या वेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी या ठिकाणची पाहणी केली. नेरळ शहरातील ६ धोकायक इमारतींना नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये आपली इमारत खूप जुनी असल्याने त्या इमारतीची दुरु स्ती करून घ्यावी, अन्यथा ती इमारत पाडून टाकावी, जेणेकरून आपल्या घराचे किंवा त्याचा शेजाऱ्यांना त्रास होणार नाही, अशी समज देण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: July 2, 2017 06:14 IST