शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

पनवेलमध्ये प्रीपेड वीजमीटर, थकबाकी कमी करण्याचा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:31 IST

पनवेल परिसरातील शासकीय वसाहतींमधील घरांना यापुढे प्रीपेड वीजमीटर बसविण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे.

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल परिसरातील शासकीय वसाहतींमधील घरांना यापुढे प्रीपेड वीजमीटर बसविण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. जितके पैसे तितके वीज बिल या धर्तीवर संबंधितांना वीज देता येणार आहे. त्याचबरोबर थकबाकीही कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास अधिका-यांनी व्यक्त केला आहे.वाढत्या वीज ग्राहकांबरोबर थकबाकीचे प्रमाणही वाढते. अनेकदा थकबाकी भरण्यास ग्राहकांकडून उदासीनता दर्शवली जाते. विशेष करून, शासकीय वसाहतींमध्ये राहत असलेले चाकरमानी बदली झाल्यानंतर वीज बिल न भरता दुसरीकडे स्थलांतरित होतात, त्यामुळे त्यांचे बिल मोठ्या प्रमाणात थकीत राहते. त्या ठिकाणी नवीन राहण्याकरिता आलेले रहिवासी थकीत बिल भरण्यास तयार होत नाहीत. त्याचबरोबर शासकीय यंत्रणेकडे अशा प्रकारे थकीत रक्कम भरण्याकरिता कोणतीही तरतूद नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महावितरण कंपनीने शासकीय वसाहतींमधील घरांना प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे.पनवेल तालुक्याचा विचार करता, पनवेल, कळंबोली या ठिकाणी शासकीय वसाहती असून, विविध विभागांत काम करणारे हजारो कर्मचारी राहतात. त्यांना तिथे प्रीपेड मीटरद्वारे वीज दिली जाणार आहे. त्याबाबत प्रक्रि या सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्या मीटरमध्ये सिम कार्ड आकाराचे कार्ड असेल. जितकी रक्कम खात्यात जमा करणार तितकीच वीज संबंधितांना उपलब्ध होईल.>खारघरला तीन हजार प्रीपेड मीटरखारघर वसाहतीत अनेक टोलेजंग इमारती आहेत. त्यानुसार महावितरण कंपनीने जवळपास तीन हजार ग्राहकांना प्रीपेड वीज मीटरद्वारे वीज दिली जात आहे. विशेष म्हणजे, या खासगी सोसायट्या आहेत. त्यामुळे थकबाकी कमी झाली असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही योजना ग्राहक आणि महावितरणच्या दृष्टीने फायदेशीर आहेच, त्याचबरोबर व्यवहारात अचूकता, पारदर्शकता आणणारी असल्याचे ते म्हणाले.प्रीपेड वीजमीटर योजना खारघरमध्ये आधीपासूनच सुरू केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम वसुली आणि इतर गोष्टींवर दिसून येत आहे. आगामी काळात नियमानुसार शासकीय घरांनाही अशा प्रकारचे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महावितरणकडून तयारी सुरू केली आहे.- माणिक राठोड, कार्यकारी अभियंता, महावितरण, पनवेल विभाग