शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या नदीचे शुद्धीकरण !

By admin | Updated: April 5, 2016 01:56 IST

पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला

प्रशांत शेडगे, पनवेल पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पनवेल परिसरातून गाढी, काळुंद्रे, कासाडी या नद्या वाहतात. यापैकी मुख्य नदी म्हणून ओळखली जाणारी गाढी नदीचा उगम माथेरानच्या डोंगररांगातून होतो. नदीचे पात्र मोठे असले तरी गावातील लोकांनी नदीकिनारी अतिक्रमण केले आहे. सुकापूर, देवद, विचुंबे, आकुर्ली, नेरे या गावातील सांडपाणी सोडले जाते. शिवाय परिसरातील ग्रामपंचायतीही याच नदीत कचरा टाकतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून दुर्गंधी येत आहे. काळुंद्रे नदीची स्थिती फारशी चांगली नाही. याही नदीपात्रात सांडपाणी, कचरा टाकण्यात येतो. कासाडी नदीचा उगम शिरवलीच्या डोंगरातून होत असून ती तळोजा एमआयडीसीतून खाडीला मिळते. याबाबत पनवेल तहसील कार्यालयात बैठक घेण्यात असून ८ एप्रिलला गाढी नदीची परिक्रमा करण्यात येणार आहे.> नदीवर बंधारे नदीवर बंधारे बांधून शेती व अन्य कारणासाठी पाण्याचा उपयोग करण्यात येणार आहे. मोहिमकरिता निधी उपलब्ध व्हावा, यासाठी काही कंपन्यांशी संपर्क साधण्यात येणार असून नागरिक, तसेच सामाजिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन तहसीलकडून करण्यात आले आहे. > तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षणनद्यांच्या परिक्रमेंतर्गत उगमापासून नदीपात्राच्या विस्तारापर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनधिकृत बांधकाम, सांडपाणी, घनकचरा कुठे कुठे टाकण्यात येतो, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. त्यानुसार त्वरित नियोजन करून आराखडा तयार करण्यात येईल. पनवेल नगरपालिका हद्दीत ज्याप्रमाणे राजीव गांधी उद्यान गाढी नदीच्या किनाऱ्यावर विकसित करण्यात आले आहे, त्या धर्तीवर सुशोभीकरणाबाबत चाचपणी करण्यात येणार आहे.