शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

पं. राम मराठे संगीत महोत्सव उद्यापासून

By admin | Updated: October 31, 2014 23:02 IST

संतूर वादक राहुल शर्मा, पं. सुरेश बापट यांच्यासह अनेक नामवंतांच्या सहभागाने यावर्षीचा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत स्मृती समारोह सजणार आहे.

ठाणो : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया, प्रसिद्घ सनई वादक कल्याण अपार, संतूर वादक राहुल शर्मा, पं. सुरेश बापट यांच्यासह अनेक नामवंतांच्या  सहभागाने यावर्षीचा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत स्मृती समारोह सजणार आहे. 
ठाणो महानगरपालिकेच्यावतीने आणि अ.भा. नाटय परिषदेच्या सहकार्याने 2 नोव्हेंबरपासून 21 व्या पं. राम मराठे संगीत समारोहास प्रारंभ होणार आहे. या संगीत स्मृती समारोहाचे उद्घाटन शिवसेना ठाणो जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आगामी नाटय़ संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका फैय्याज, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अॅड़ निरंजन डावखरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 
या संगीत स्मृती समारोहाचे  पहिले पुष्प गायिका श्रद्घा जैन व प्रसिद्घ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र प्रसिद्घ संतूर वादक राहुल शर्मा गुंफणार असून, त्यांना तबला साथ करणार आहेत मुकुंदराज देव.  दुस:या दिवशी सं. मंदारमाला नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सुवर्ण मंदार’ हा नाटय़संगीताचा विशेष कार्यक्रम होणार आहे. 
या कार्यक्रमाची संकल्पना मुकुंद मराठे, निवेदन धनश्री लेले यांचे असून गायक ज्ञानेश पेंढारकर, संजय मराठे, संजीव मेहेंदळे, प्राजक्ता मराठे आणि रजनी जोशी वैशिष्टय़पूर्ण नाटय़पदे सादर करणार आहेत.
संगीत राज्य नाटय़स्पर्धेतील विजेती नाटय़कृती ‘संगीत संशयकल्लोळ’ या प्रसिद्घ नाटकाने महोत्सवाचा तिसरा दिवस सजणार आहे. तर रात्रीच्या सत्रमध्ये मधुरा करंबेळकर यांचे सतार वादन ठेवण्यात आले आहे. प्रसिद्घ गायक पं. सुरेश बापट यांच्या गायनाने या दिवसाच्या सत्रचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)
 
एकापेक्षा एक सरस कलांचा आस्वाद विनामूल्य
4या समारोहाच्या चौथ्या दिवशी ‘सिंगारमणी’ किताब प्राप्त प्रसिद्घ नृत्यांगना सरिता काळेले यांचे कथ्थक नृत्य सादर होणार आहे.  त्यानंतर तरुण गायिका सूरश्री जोशी व वीणा सावले यांच्या गायनाने दिवसाच्या शेवटच्या सत्रचा समारोप होणार आहे.
4या समारोहाचा समारोप प्रसिद्घ सनई वादक कल्याण अपार यांच्या सनई वादनाने व आंतरराष्ट्रीय किर्तीचे बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे.
4हा महोत्सव सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून या समारोहाचा ठाणोकर नागरिकांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन महापौर संजय  मोरे यांनी केले आहे.