नवी मुंबई : बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरूवारी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास भेट दिली. शहरवासीयांना चांगली बससेवा उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना त्यांनी सभापती व प्रशासनासमोर मांडल्या. नवी मुंबईतील नागरिकांना चांगली बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने परिवहन उपक्रम (एनएमएमटी) सुरू केला आहे. महापालिका कार्यक्षेत्रासह उरण, पनवेल, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीपर्यंत उपक्रमाच्या बसेस धावत आहेत. बसेसविषयी प्रवासी अनेक वेळा तक्रार करत असतात. बसेस वेळेवर येत नाहीत व इतर अनेक समस्या असतात. एनएमएमटीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी भेट दिली. सभापती साबू डॅनियल, अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याशी चर्चा केली. उपक्रमाच्या सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. एनएमएमटी ही शहराची रक्तवाहिनी आहे. यामुळे नागरिकांना चांगली परिवहन सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. सभापती साबू डॅनियल यांनीही सर्व सूचनांची योग्य दखल घेवून अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले. या बैठकीला डॉ. राजेश पाटील, श्रीराम घाटे, मारूती भोईर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रवाशांना दर्जेदार सुविधा द्या
By admin | Updated: October 29, 2015 23:46 IST