शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाळणाघराच्या उदघाटनाचा पाळणा हलेना मनसेतर्फे आंदोलन : प्रशासनाला दिली महिन्याची मुदत

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 6, 2023 16:34 IST

पाळणाघराची वास्तू तयार होऊनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदघाटन रखडले आहे.

नवी मुंबई : पाळणाघराची वास्तू तयार होऊनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उदघाटन रखडले आहे. याच्या निषेधार्थ मनसेतर्फे पाळणाघराबाहेर आंदोलन करून पाळणा हलवला. यावेळी पालिकेने महिन्याभरात प्रत्यक्षात पाळणाघर वापरासाठी खुले न केल्यास आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रशासनाला दिला. 

महापालिकेने सीवूड येथे पाळणाघराची इमारत उभारली आहे. मात्र काम पूर्ण होऊन देखील अद्याप पर्यंत इमारतीचे उदघाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेली इमारत वापराविना पडून आहे. याबाबत मनसेने अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही प्रशासन गांभीर्य घेत नसल्याने सोमवारी पाळणा घराबाहेर पाळणा हलवून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे नेत्या शालिनी ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

आंदोलनानंतर त्यांनी पालिका उपायुक्तांची देखील भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरले. वास्तू उभारून देखील त्या लोकांच्या उपयोगी येत नसल्यास, त्यांचा उपयोग काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे एक महिन्यात प्रशासनाने हे पाळणाघर नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे असा इशारा दिला आहे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असाही इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. याप्रसंगी महिला शहर अध्यक्ष आरती धुमाळ, सविनय म्हात्रे, सचिन कदम, अमोल आयवळे, उमेश गायकवाड, अप्पासाहेब जाधव आदी उपस्थित होते.