शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण रोखण्यासाठी जुहूगाव येथील ट्री बेल्टला संरक्षण भिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 22:50 IST

वाशीतील जुहूगाव सेक्टर ११ येथील ट्री बेल्ट खुला असल्याने या ठिकाणी अतिक्र मण होत असून या भागात डेब्रिज आणि कचरा टाकला जातो.

नवी मुंबई : जुहूगाव सेक्टर ११ येथील स्वामी नारायण मंदिर ते जुहूगाव स्मशानभूमी दरम्यानचा ट्री बेल्ट खुला असल्याने या ठिकाणी अतिक्र मण होत असून डेब्रिज टाकले जाते त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ट्री बेल्टला संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. सदर प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून शहरातील अपूर्ण संरक्षक भिंतींची कामे पूर्ण करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनाला दिले आहेत.

वाशीतील जुहूगाव सेक्टर ११ येथील ट्री बेल्ट खुला असल्याने या ठिकाणी अतिक्र मण होत असून या भागात डेब्रिज आणि कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली असते. परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सदर परिसरात संरक्षक कुंपण बांधण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी मांडला होता यावर चर्चा करताना नगरसेवक सुनील पाटील यांनी नेरु ळ पोलीस ठाण्याजवळील मोठ्या संरक्षण भिंतीला तडा गेला असून या भिंतीच्या शेजारीच शाळा आहे त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सदर भिंतीचे काम महापालिकेने करावे, अन्यथा नगरसेवक निधीचा वापर करून करण्यात यावे अशी मागणी केली.

नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी गेल्यावर्षी पावसाळ्यात सीबीडी येथील डोंगराची माती मोठ्या प्रमाणावर वाहून आली होती त्यामुळे वित्तहानी झाली होती. महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा देण्याच्या दृष्टीने संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यात आले होते, परंतु काम अर्धवट ठेवण्यात आले असल्याचे नाथ यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी दिघा भागात देखील संरक्षण भिंतींचा मोठा प्रश्न आहे.शहरात अनेक ठिकाणच्या भिंतींचे काम अपूर्ण असून ते पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी अपूर्ण असलेल्या भिंतींची पाहणी करून कामे पूर्ण केली जातील. तसेच नेरु ळ पोलीस ठाण्यालगतच्या भिंतीची पाहणी करून पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.