शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनपा भवनाकरिता अडगळीचा प्रस्ताव , प्रशासनाने मागितली पर्यायी जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 02:12 IST

पनवेल महानगरपालिका भवनाकरिता सिडकोने कर्नाळा स्पोटर््स अकादमीच्या बाजूला नाल्यालगत अडगळीची जागा देऊ केली आहे.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका भवनाकरिता सिडकोने कर्नाळा स्पोटर््स अकादमीच्या बाजूला नाल्यालगत अडगळीची जागा देऊ केली आहे. मात्र याकरिता पर्याय भूखंड देण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने दिला आहे. महापौर निवासाकरिता सुध्दा याच परिसरात जागा देऊ केली असली तरी हे निवास मध्यवर्ती ठिकाणी असावे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.महापालिकेकडे सद्यस्थितीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने जागेची अडचण फारशी भासत नाही. परंतु आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर भविष्यात त्याकरिता प्रशस्त इमारतीची आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टिकोनातून कोणत्या ठिकाणी महापालिकेचे मुख्यालय असू शकते याबाबत सर्व्हे करण्यात आलेला आहे . त्यानुसार खांदा वसाहतीतील सर्कस मैदान, आसुडगाव बस आगारासमोर मोकळे मैदान आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकालगतची मोकळी जागा महापालिका भवन उभारण्याकरिता मिळावी यासाठी सिडकोकडे सुरुवातीला आग्रह धरण्यात आला होता. तक्का येथील महापालिकेच्या जागेवर प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचे प्रशासकीय भवन असावे असा ठराव नगरपालिकेत झाला होता. परंतु ही जागा अपुरी पडेल तसेच येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोईस्कर वाटत नाही हा मुद्दा पुढे आला. सिडको हद्दीतच महापालिका भवन असावे असा प्रस्ताव आहे. याकरिता प्रशस्त इमारत उभारण्यात यावी तिथे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकरिता दालन, विविध विभागाकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, सुविधा केंद्र, सभागृह, शौचालय, पिण्याचे पाण्याची सोय तसेच वाहने उभी करण्याकरिता पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक स्वरूपाच्या सोयी-सुविधा या ठिकाणी विकसित करण्याबरोबरच लिफ्ट, सरकते जीने, सीसी कॅमेरे, वायफाय, अतिशय सुंदर स्वागत कक्षाची व्यवस्था असावी असे नियोजन आहे.नागरिकांनी प्रशासकीय भवन अतिशय सहनपणे गाठता येईल यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे.सिडकोने कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या बाजूला असलेल्या नाल्यालगत महापालिका भवनाकरिता जागा देऊ केली आहे. मात्र हा परिसर मध्यवर्ती नाही त्याचबरोबर जागा पुरेशी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. याशिवाय महापौर निवासाकरिताही कर्नाळा अकादमीजवळच सिडकोने जागा प्रस्तावित केली आहे. परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यांना सहज भेटता यावे या गोष्टी विचारात घेऊन महापौर निवासाकरिता जागा द्यावी अशी मागणी सिडकोकडे करण्यात येणार आहे.पनवेल महानगरपालिकेचे भवन उभारण्याकरिता सिडकोने कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीजवळ जागा देण्याचे कळविले आहे. त्याचबरोबर महापौर निवासासाठी सुध्दा याच भागात भूखंड सिडकोने देऊ केले आहे. मात्र आपण या दोनही इमारतींकरिता दुसरी जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. आयुक्त निवासाची जागा योग्य असून त्यादृष्टीने आपण त्यांना कळविले आहे.- संजय कटेकर,शहर अभियंता, पनवेल महानगरपालिकाआयुक्त निवास खारघरमध्येमहापालिका आयुक्तांच्या निवासाकरिता खारघर सेक्टर २१ येथे जागा देण्यात येणार आहे.त्याबाबत सिडकोकडून महापालिकेला कळविण्यात आले आहे.प्रशासनाने याकरिता हिरवा कंदील दिला आहे. एकूण अर्धा एकर जागेवर इमारत उभारणार आहे.लवकरच सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.