शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दहा शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: May 12, 2016 03:21 IST

पोलीस आयुक्तालयातून गत काळात मंजूर झालेल्या शस्त्र परवान्यांमध्ये हद्दीबाहेरील पत्त्यांवर वास्तव्य असणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईपोलीस आयुक्तालयातून गत काळात मंजूर झालेल्या शस्त्र परवान्यांमध्ये हद्दीबाहेरील पत्त्यांवर वास्तव्य असणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. यामुळे सर्वच शस्त्र परवान्यांच्या छाननीला नव्याने सुरवात करण्यात आली असून १० परवाने रद्द करण्याची प्रक्रिया आयुक्त स्तरावर सुरू आहे.खासगी पिस्तूल बाळगणे ही प्रतिष्ठेची बाब समजली जावू लागली आहे. यामुळे खासगी शस्त्र वापरासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी मिळवण्यासाठी अनेकांचे विविध खटाटोप सुरू असतात. काही जण उद्योग-व्यवसायाच्या नावाखाली, तर काही जण स्वत:च्या जिवाला धोका असल्याचे भासवून हा परवाना मिळवतात. काहींनी तर शस्त्र परवाना सहज मिळावा यासाठी नियोजनबद्धरीत्या स्वत:वर खोटे हल्ले करून घेतल्याच्याही घटना शहरात घडलेल्या आहेत. एखाद्या माथेफिरूला शस्त्र परवाना मिळाल्यास तो स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी परवाना असलेल्या शस्त्राचा वापर करु शकतो. यामुळे शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची पुरेपूर चौकशी करूनच त्याला मंजुरी देणे आवश्यक असते. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत गतकाळात शस्त्र परवाना वाटपात निष्काळजीपणा झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त व उपायुक्तांनी अद्यापपर्यंतच्या सर्व शस्त्र परवान्यांच्या छाननीला नव्याने सुरवात केली आहे. त्यामध्ये १० परवाने आक्षेपार्ह आढळून आल्याने ते रद्द करण्याचा प्रस्ताव पटलावर घेण्यात आलेला आहे. आक्षेप घेतलेल्या परवान्यांपैकी काहींवर गुन्हे दाखल असतानाही ते स्वत:जवळ परवानाधारक शस्त्र बाळगून होते, तर काहींचे वास्तव्यच आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरचे असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. मुंबईसह राज्याबाहेरील वास्तव्याचे पुरावे सादर करुन हे परवाने संबंधितांनी मिळवले होते.पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून आजतागायत १,६७१ परवान्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये ९८३ परवान्यांमध्ये विविध बँकांचे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक, वास्तव्याचे ठिकाण बदलल्यानंतरची नोंदणी किंवा शासनाकडून आलेल्या शिफारशीनुसार दिलेल्या परवान्यांचा समावेश आहे, तर ६८८ परवाने मागील वीस वर्षांत तत्कालीन आयुक्तांमार्फत मंजूर झालेले आहेत. त्यापैकी सन २००८ व ०९ मध्ये अनुक्रमे १२० व १०७ परवान्यांचे वाटप झालेले असून इतर प्रत्येक वर्षी किमान ४ ते ७० परवान्यांचे वाटप झालेले आहे.