शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड, लवकरच होणार सिटी सर्व्हे -  राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:56 IST

प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे; परंतु राज्य सरकारने आता त्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच गावांचा सिटी सर्व्हे करून, प्रकल्पग्रस्तांना पॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे; परंतु राज्य सरकारने आता त्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच गावांचा सिटी सर्व्हे करून, प्रकल्पग्रस्तांना पॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. त्यानंतर सर्वसमावेशक धोरण तयार करून गरजेपोटीची बांधकामे नियमित केली जातील, अशी ग्वाही नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी दिली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी सिडकोच्या निर्मल कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच सिडकोच्या संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नवी मुंबईतील गावांचा सिटी सर्व्हे न झाल्याने गावठाण विस्ताराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी उभारलेली बांधकामे अधिकृत आहेत की अनधिकृत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत सिडकोने सरसकट सर्वच बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपली राहती घरे वाचविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१५पर्यंतची सर्व बांधकामे नियमित करण्याचे जाहीर केले होते. यात गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांचाही समावेश असल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला होता. असे असले तरी घोषणा होऊन पाच-सहा महिने उलटले तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा, यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे आग्रह धरला आहे. शनिवारी पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रथम गावांचा सिटी सर्व्हे करून, प्रकल्पग्रस्तांना पॉपर्टी कार्ड द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच प्रत्येक पात्रताधारकाला भूखंड मिळत नाही, तोपर्यंत साडेबारा टक्के भूखंड योजना सुरूच ठेवावी, अशी विनंतीही त्यांनी केली.प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यानुसार लवकरच गावांचा सिटी सर्व्हे केला जाईल. त्यानंतर प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना पॉपर्टी कार्ड देऊन सर्वसमावेशक चर्चेनंतर ही बांधकामे नियमित करण्याचे धोरण तयार केले जाईल, अशी ग्वाही नगरविकास विभागाचे सचिव नितीन करीर यांनी या वेळी दिली. तर ठाणे जिल्ह्यातील साडेबारा टक्के योजनेअंतर्गत ९२ टक्के लाभार्थींना भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ८ टक्के लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांद्वारे पात्रता सिद्ध करून दिलेल्या मुदतीत आपले भूखंड घ्यावेत, असे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या वेळी केले.सर्व्हेला प्रकल्पग्रस्तांचा विरोधगावांच्या सिटी सर्व्हेला प्रकल्पग्रस्तांचा सुरुवातीपासून विरोध आहे. यापूर्वी १ मे २00७ रोजी गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी गावांच्या सिटी सर्व्हेला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने ही योजना पुढे जाऊ शकली नाही. अगोदर बांधकामे नियमित करा, मगच सर्व्हे करा, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने राज्य सरकराच्या नव्या भूमिकेला कितपत यश मिळेल याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई