शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रकल्पग्रस्तांची चळवळ

By admin | Updated: November 26, 2015 01:33 IST

सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला.

कमलाकर कांबळे, नवी मुंबई सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला. परंतु ज्यांच्या त्यागामुळे सिडकोने हा डोलारा उभारला, ते प्रकल्पग्रस्तच दुर्लक्षित राहिले. शहराचा विकास करताना येथील गावांचा विकास खुंटला. असे असले तरी प्रकल्पग्रस्तांच्या युवा पिढीने विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी स्मार्ट व्हिलेजची संकल्पना तयार करण्यात आली आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या नवी मुंबईची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी संकल्पनेच्या प्रसारासाठी केंद्र शासनाकडून महापालिकेला दोन कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्याद्वारे महापालिकेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीविषयी जनजागृती अभियान सुरू केले आहे. मात्र येथील मूळ गावांचा विकास झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची संकल्पना अस्तित्वात येणार नाही, मात्र विकासाअभावी बकाल झालेल्या येथील मूळ गावांचा स्मार्ट सिटी अभियानाला अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवापिढीने येथील गावेच स्मार्ट करण्याचा निर्धार केला आहे. आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांची सुशिक्षित पिढी पुढे सरसावली आहे. सकारात्मक भूमिकेतून मागील सहा महिन्यांपासून हे प्रकल्पग्रस्त तरूण कामाला लागले आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील २८ गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी या तरूणाईने कंबर कसली आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामस्थांचे प्रबोधन केले जात आहे. स्मार्ट व्हिलेज म्हणजे काय याविषयी माहिती देण्यासाठी फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. विशेष म्हणजे स्मार्ट व्हिलेजची संकल्पना विषद करण्यासाठी दीड तासाचे डॉक्युमेंटेशन तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विविध स्तरावर त्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. त्याला ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या या तरूण पिढीचा उत्साह दुणावला आहे.शहरी भागात आलिशान इमारती, प्रशस्त रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय सुविधा आदींची नियोजनबध्द पध्दतीने आखणी केली. परंतु उपनगराचा विकास करताना येथे असलेल्या मूळ गावांकडे मात्र सिडकोचे दुर्लक्ष झाले. सिडकोच्या नियोजनात राहून गेलेली समतोल विकासातील ही त्रुटी जागतिक स्तरावर नोंद झालेल्या या शहराच्या लौकिकास बाधा निर्माण करणारी ठरली आहे. शहराचा विकास करताना येथील मूळ गावेही विकासाच्या टप्प्यात येणे गरजेचे होते. मात्र सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या गावांची अवस्था झोपडपट्ट्यांपेक्षाही भयानक झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत प्रकल्पग्रस्तांची कुटुंबे वाढली. मुलांची, नातवंडांची लग्ने झाली. या विस्तारित कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधकामे उभारली. या अनियंत्रित बांधकामांमुळे गावे बकाल झाली आहेत. जुन्या कौलारू घरांची जागा ओबडधोबड इमारतींनी घेतली आहे. ग्रामस्थांना प्रलोभने दाखवून भूमाफियांनी गावातील मोकळ्या जागा बळकावल्या. त्यावर बेकायदा चाळी आणि टोलेजंग इमारती उभारल्या. त्यामुळे गावांतील प्रशस्त रस्त्यांचे पायवाटेत रूपांतर झाले आहे. वीस वर्षांपूर्वी ज्या घरांच्या दारापर्यंत चारचाकी वाहने जायची आता तेथपर्यंत रिक्षा नेणेही अवघड होवून बसले आहे. नाले आणि गटारांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने सांडपाणी वाहून नेण्याची जबाबदारी उरल्यासुरल्या रस्त्यांवर येवून ठेपली आहे. एकूणच या गावांतील प्राथमिक सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदतकार्य पोहचविताना कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या युवा ब्रिगेडने उचललेले हे पाऊल भावी पिढीसाठी आशादायक ठरणारे आहे.