शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

प्रगतशील शेतकऱ्यांना संधी देणे आवश्यक

By admin | Updated: July 2, 2017 06:15 IST

जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. त्याचा विकास होण्याकरिता त्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रायगड जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांचा

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. त्याचा विकास होण्याकरिता त्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने रायगड जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांचा हा सत्कार सोहळा ठेवला आहे. जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या प्रगतशील शेतकऱ्यांचा आदर्श कायम राहिला पाहिजे. कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मेळावे, शिबिर भरविले जातात. या कार्यक्रमांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांना संधी देण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केले.हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधून जि. प.च्या ना. ना. पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अदिती तटकरे बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रेय पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रिया वेटकोळी, उपसभापती प्रकाश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा कृषी अधीक्षक काशीनाथ तरकसे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, रवींद्र पाटील, बाजीराव परदेशी, गटविकास अधिकारी सुनील प्रधान आदी मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्व सत्कारमूर्ती शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील म्हणाले, जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करून प्रत्येकाने झाडे वाढविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करून त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होईल. जिल्हा परिषदेमार्फत टूरिस्ट रिसॉर्ट करण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या पर्यटकांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.अलिबाग, पेण, पोलादपूर येथे कृषी उत्पादन विक्री केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ देणे शक्य होऊ शकेल. कृषी विभागासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी अखेरीस सांगितले.कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील जोमा दरवडा, पांडुरंग पारधी, प्रभाकर सखाराम पाटील, संतोष मांढरे, रामकृष्ण ठाकूर, सुनील ठाकूर, मोहन राणे, दत्तात्रेय पाटील, नामदेव बैलमारे, हरिश्चंद्र गरु डे, भगवान बेलोसे, नाथा हंबीर, जनार्दन वेटकोळी, बाळाराम निरगुडा, राधिका पाटील, विनोद दिवेकर, धर्माजी हिरवे, गोविंद वाघमारे, सुरेश वाघमारे, नथुराम भोईर, विजय वाघमारे, नारायण गोरेगावकर, मंगेश काप, नथुराम चोरगे, धनंजय सावंत, सहदेव खामकर, बबन खेडेकर, परेश पोलेकर, नारायण काते, किशोर फाळके, रामचंद्र कदम, सुधीर यादव, संदीप गोंधळी, गोविंद पाटील, कमळाकर कुऱ्हाडे, गणपत खारपाटील, लक्ष्मण पवार, जयपाल पाटील या प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. अलिबागमधील गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी सुनील प्रधान, उरण येथील विस्तार अधिकारी प्रतिमा गोरे, माणगावमधील विस्तार अधिकारी रणजित लवटे, पोलादपूर येथील कृषी अधिकारी संभाजी भोइटे, पेणचे कृषी अधिकारी मच्छींद्रनाथ भालेराव चार गुणवंत कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, कृषी सभापती दत्तात्रेय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांच्या हस्ते सर्व गुणवंताचा सत्कार करण्यात आला.