शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ढोलताशांची मिरवणूक, पनवेलच्या शिवप्रेमींमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 01:27 IST

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या

नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शहरात उत्साहात साजरा झाला. शहरात विविध ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा नामगजर करण्यात आला. लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात शहरात रॅली काढण्यात आल्या, तसेच जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजनदेखील करण्यात आले होते.वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, सभागृह नेते रवींद्र इथापे आदी नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका मुख्यालयातदेखील शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. सानपाडा येथील डॉ. आर.एन. पाटील सूरज हॉस्पिटल, भारतीय जनता पक्ष व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात उपचारांसोबत मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्र माचे आयोजन आर्यवर्त फाउंडेशनचे अजिंक्य घरत आणि भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या महामंत्री मंगल घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.सीवूड विभागात भाजप युवा मोर्चाचे दत्ता घंगाळे आणि प्रभाग क्र मांक १११च्या महिला प्रभाग अध्यक्ष अश्विनी घंगाळे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवसंकल्प सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या माध्यमातून वाशी शिवाजी चौक ते शंकरराव विश्वासराव विद्यालयापर्यंत लेझीम पथक आणि ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शंकरराव विश्वासराव विद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि आयसीएल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.घणसोली परिसरात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्या हस्ते शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. या वेळी परिवहन समितीचे माजी सभापती मोहन म्हात्रे, कवी शांताराम लोखंडे आदी उपस्थित होते.पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनपनवेल शहरासह खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा आदी ठिकाणी शिवजयंतीनिमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व ठिकाणी भव्य मिरवणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्ताने पनवेल शहरात वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याव्यतिरिक्त खारघर शहरात शिवाजी महाराज एक महान योद्धा या विषयावर निबंध लेखन स्पर्धांचेदेखील आयोजन भारत रक्षा मंचच्या वतीने करण्यात आले होते. खारघर शहरातील अनेक शाळांमध्ये या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. सायंकाळी मराठा समाज, खारघर यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्र मात आपला सहभाग नोंदवला.लेझीम पथकासह मिरवणूकपनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्र मात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृह नेते परेश ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने नगरसेवक व शहरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी उपस्थिती होते. त्याचबरोबर या मिरवणुकीत विविध शाळा, संस्थांचे विद्यार्थी, ढोलताशा पथक, लेझीम पथक या भव्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवाजी चौकातून निघालेल्या मिरवणुकीचा टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला.भव्य रॅलीचे आयोजनऐरोली प्रभाग क्र मांक १५ येथे गणेश रहिवासी सेवा मंडळ व माजी नगरसेवक अशोक पाटील यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरात भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी माजी आमदार संदीप नाईक, नगरसेविका संगीता पाटील, कैलास गायकर, राजेंद्र जोशी, नामदेव कुंभार, सदानंद दरेकर, शिवाजी कोळी, प्रसाद शिंदे, किसन शिंदे, राजेश शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई