शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रि या झालेले पाणी वापराची सक्ती !

By admin | Updated: April 25, 2016 03:14 IST

सिडको वसाहतीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते खाडीत सोडून दिले जाते, मात्र अलीकडे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने उपाय म्हणून मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीसिडको वसाहतीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते खाडीत सोडून दिले जाते, मात्र अलीकडे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने उपाय म्हणून मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. एकूण २२० कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. हे पाणी इतर कारणाकरिता वापरण्याची सक्ती करण्याचा विचार पाणीपुरवठा विभाग करत आहे. त्या दृष्टीने बोर्डाकडे प्रस्ताव सुध्दा सादर करण्यात येणार आहे.नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे या सिडको वसाहतींमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सगळ्या वसाहतीत मलनि:सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांव्दारे सदनिकांतून निघणारे सांडपाणी त्या त्या वसाहतीतील मलनि:सारण केंद्रात सोडण्यात येते. या चारही वसाहतीत मलनि:सारण केंद्र आहेत. सांडपाण्यावर याच केंद्रामध्ये प्रक्रि या केली जाते. त्यानंतर हे पाणी खाडीत सोडण्यात येते, मात्र शास्त्रशुध्द पध्दतीने प्रक्रि या केलेले हे पाणी उपयोगात आणता येऊ शकते. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोकडे प्रस्ताव आहे. सिडकोला एमजेपी आणि मनपाकडून पाणी घेते. त्यांच्याकडून मागणीनुसार पाणी नाही मिळाले तर वसाहतींमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू होते. उन्हाळ्यात पाण्याची निकड भासत असल्याने त्याच्यावर उपाययोजना म्हणून मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेले पाण्याचा वापर करणे फायदेशीर ठरेल असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानुसार सिडकोने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचे नियोजन करण्याकरिता आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याकरिता सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. लोकांची मानसिकता नसल्याने हे पाणी वापरण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र घरात शौचालय, कपडे धुणे त्याचबरोबर झाडांना हे पाणी वापरण्याकरिता सक्ती करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.> ग्रे वॉटरचा पुनर्वापर करण्याकरिता आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत. याकरिता सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. त्या एजन्सीकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. एकूण ५५ एमएलडी पाणी पुनर्वापराकरिता उपलब्ध होवू शकणार आहे. हे पाणी नागरिकांना स्वस्त दरात मिळणार असल्याने त्यातून बचत होणार आहे. तशी सक्ती करावी लागेल त्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला प्रस्ताव देण्याचा विचार करत आहोत.- रमेश गिरी, अधीक्षक अभियंतापाणीपुरवठा विभाग, सिडको