शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मागील २० वर्षांपासून रखडलेल्या उरण बायपास रस्त्यांसाठी उनपकडून भूसंपादनाची कार्यवाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 22:10 IST

वन, पर्यावरण विभागामुळेच २९ कोटी खर्चाचा रस्ता लालफितीत अडकला 

मधुकर ठाकूर

उरण  :  उरण शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीचा भार हलका करण्यासाठी तयार करण्यात आलेला २९ कोटी खर्चाच्या उरण बायपास रस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या खासगी जमिनी संपादित करण्याची तयारी उरण नगरपरिषदेने सुरू केली आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेल्या भुसंपादनाच्या बदल्यात मोबदल्या ऐवजी जमिन मालकांना दोनपर्यंत एफएसआय देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती उरण नगररचना विभागाचे सहाय्यक रचनाकार सचिन भातुसे यांनी दिली. 

उरण शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीचा भार हलका करण्यासाठी कोटनाका ते बोरी-पाखाडी दरम्यान बायपास रस्ता तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती.सुमारे २० वर्षांपूर्वी या बायपास रस्त्याच्या कामाचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता.मात्र शुभारंभानंतरही मागील २० वर्षांपासून बायपास रस्त्याचे काम कागदावरच राहिले आहे.दरम्यानच्या काळात उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी बायपास रस्त्यांची मागणी सिडकोकडे लाऊन धरली होती.

त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीने बायपास रस्त्याच्या कामासाठी सिडकोने पुढाकार घेतला होता.मात्र या १२ मीटर रुंदीचा बायपास रस्ता वन, महसूल, सिडकोच्या जागेवरून जात आहे. तसेच उनप हद्दीतील खासगी घरे,जमिनीही बाधीत होत आहे. तसेच बायपास रस्त्याच्या कामासाठी वन आणि पर्यावरण खात्याचा अडसर निर्माण झाला आहे.त्यांची मंजूरी आवश्यक आहे.मात्र  सिडकोची उरण बायपास रस्त्याच्या मंजुरीसाठी वन आणि पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आलेली फाईल अद्यापहीलालफितीत अडकलेली असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.मात्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे उरण बायपास रस्त्याचा खर्च आठ कोटीवरुन आता ३० कोटींहून अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान उरण शहरातील सातत्याने होणारी वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी उरण शहराबाहेरुन कोटनाका ते उरण कोर्ट -बोरी दरम्यान बायपास रस्त्यांसाठी उनपनेही कंबर कसली आहे. उनप हद्दीतील खासगी १५ मुळ भोगवटादार आणि इतरांच्या मालकीच्या जमिनी संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रशासकीय ठरावही मंजूर करण्यात आला आहे.उनपची आर्थिक स्थिती बेताची असल्याने जमिन मालकांना संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या बदल्यात मोबदला देणे शक्य होणार नाही.त्यामुळे मोबदल्याच्या बदल्यात खासगी जमिनधारकांना दोनपर्यंत एफएसआय देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानंतर भू-संपादनासाठी उनप हद्दीतील १५ मुळ भोगवटादार आणि इतरांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती उरण नगररचना विभागाचे सहाय्यक रचनाकार सचिन भातुसे यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :uran-acउरण