शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पामबीचवर कबुतरांमुळे अपघाताची शक्यता; मोटारसायकलस्वारांची सुरक्षा धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:57 IST

पुलावर धान्य न टाकण्याचे आवाहन

नवी मुंबई : पामबीच रोडवर नेरूळ व सानपाडामधील पुलाच्या कठड्यावर नागरिक पक्ष्यांसाठी धान्य ठेवू लागले आहेत. यामुळे येथे कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. येथे धान्य टाकू नये याविषयी जनजागृती करण्याची मागणीही केली जात आहे.

नवी मुंबईमधील महत्त्वाच्या रोडमध्ये पामबीच रोडचाही समावेश आहे. सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सिडकोने ९ किलोमीटरचा हा रस्ता बनविला आहे. या रोडवर पादचाऱ्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहने वेगाने असल्यामुळे वारंवार अपघात होत असतात. काही महिन्यांपासून वाशीकडे जाणाºया मार्गिकेवर सारसोळेच्या पुढील पुलावर नागरिक पक्ष्यांसाठी धान्य ठेवू लागले आहेत. यामुळे येथे कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेकडो कबुतरे पहाटेपासून सायंकाळपर्यंत येथे असतात. अचानक शेकडो कबुतरे रोडवर आल्यामुळे वाहनचालकांचा तोल जाऊ लागला आहे. दुचाकीस्वारांना कबुतरे धडकल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. पामबीच रोडवर पक्ष्यांसाठी धान्य टाकण्यास नागरिकांना मनाई करावी. वाहतूक पोलीस व महानगरपालिकेने याविषयी जनजागृती करावी. पुलाच्या दोन्ही बाजूंना सूचना फलक लावण्यात यावेत अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. पामबीच रोडऐवजी सर्व्हिस रोडवर किंवा इतर ठिकाणी पक्ष्यांना धान्य टाकावे, असे आवाहनही दक्ष नागरिकांनी केले आहे.पामबीच रोडवर अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सारसोळे व सानपाडामधील पुलावर पक्षांसाठी धान्य ठेवल्यामुळे कबुतरांची संख्या वाढली असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पामबीचऐवजी सर्व्हिस रोड किंवा इतर ठिकाणी पक्ष्यांना धान्य टाकण्यात यावे. प्रशासनानेही याविषयी जनजागृती करावी. - निशांत भगत, युवा नेते भाजप