शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाचा फटका

By admin | Updated: April 6, 2016 04:18 IST

खोपोलीकरांना चांगली बससेवा मिळावी, परिवहन सेवेवरील तोटा कमी व्हावा म्हणून २०१३ मध्ये परिवहन सेवेचे खाजगीकरण करण्यात आले

नितीन भावे , खोपोलीखोपोलीकरांना चांगली बससेवा मिळावी, परिवहन सेवेवरील तोटा कमी व्हावा म्हणून २०१३ मध्ये परिवहन सेवेचे खाजगीकरण करण्यात आले. परंतु ठेकेदाराबरोबर केलेल्या करारामुळे नगरपरिषदेचे दरवर्षी ४० ते ५० लाख रु पयांचे नुकसान होत आहे. ही बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल वाघमारे यांच्या तक्रारीनंतर स्पष्ट झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव करणाऱ्या नगरसेवकांना नोटीस बजावली असून ११ एप्रिलला सुनावणी होणार आहे. खोपोली शहर परिवहन सेवेचे खासगीकरण करण्यासाठी ८ जानेवारी २०१३ ला करार केला. त्यानंतर १ मेपासून सुधीर रोडलाइन्स यांची परिवहन सेवा खोपोलीत सुरू झाली. करारामध्ये नगरपरिषदेच्या प्रत्येक बसमागे १० हजार रु . व ठेकेदाराच्या १६ बससाठी प्रति किमी ८ रु. ८८ पैसे इतका दर निश्चित करण्यात आला. सिटीबस डेपोचे १४.१५ गुंठे जागेचे भाडे, शाळेची मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना पासची सवलत. अशा अनेक अटी-शर्तींना मान्यता देण्यात आली होती. हा करारनामा १० वर्षे बंधनकारक असून करारनाम्यातील अटींचे पालन ठेकेदारांकडून होत नाही, असे असतानाही ६ सप्टेंबर २०१३ ला सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा ठराव करुन सर्व २१ बसेससाठी दरमहा १०,२५० रु पये घेण्याचे ठरले. सिटीबसच्या दरामध्ये २० ते ३० टक्के भाडेवाढही केली. शासनाकडून ठेकेदाराला प्रत्येक बसमागे थेट ८ हजार रु. अनुदान देण्याचा ठराव केला. याचा अर्थ ८० टक्के सूट देण्यात आली. आता प्रत्येक बसमागे फक्त २,२५० रु ठेकेदाराला नगरपरिषदेस द्यावे लागणार आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनीही भाडे ठरविण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याची बाब दोन महिन्यांपूर्वी सभागृहासमोर आली. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी ८ दिवसांत यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते, परंतु जागेचे भाडे अद्यापही निश्चित झालेले नाही.