शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित; महाविद्यालयाबाहेर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 23:48 IST

कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत गुरुवारी एक विद्याथिंर्नी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेज बाहेरील एका तरुणाने तिच्यासमोर अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला.

मुंबई : महाविद्यालयांत असतानाच तरुणीशी अश्लील चाळे करून , विनयभंग केल्यावर खुद्द प्राचायार्नीच तिला तब्ब्ल ३ तास वर्गखोलीत डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार कामोठे येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत घडला. पीडित विद्यार्थिनींची तक्रार गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी संतप्त विद्यार्थ्यांच्या जमावाने महाविद्यालयांत जोरदार आंदोलन करून महाविद्यालयीन प्रशासनाला प्राचार्यांची पदावरून हाकलपट्टी करण्याची मागणी केली. दरम्यान विद्यार्थी संघटनांनीही यामध्ये उडी घेतल्याने अखेर कॉलेज प्रशासनाने प्राचार्यांचे निलंबन केले.

कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत गुरुवारी एक विद्याथिंर्नी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेज बाहेरील एका तरुणाने तिच्यासमोर अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनींने तातडीने हा प्रकार महाविद्यालयांचे प्राचार्य संतोष नारायाण खेडेकर यांना सांगितला. परंतु प्राचार्यानी तरुणावर कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्यासाठी व पीडीत मुलीने गुन्हा दाखल करू नये यासाठी तिला एका वर्गामध्ये डांबून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दोषी तरुणावर कारवाई करण्याऐवजी विद्याथिंर्नीला डांबून ठेवल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत गोंधळ घातला. अखेर महाविद्यालय प्रशासनाकडून विद्याथिंर्नीच्या पालकांना व पोलिसांना कळवण्यात आले. मात्र त्यानंतरही तरुणावर कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले.

दरम्यान मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य अ‍ॅड वैभव थोरात यांनी हा प्रकार कळताच गुन्हेगाराला पाठिशी घालणाऱ्या प्राचार्याना तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांचा संताप व विद्यार्थी संघटनांनी घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळे अखेर कॉलेज विश्वस्तांकडून प्राचार्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.यापुढेही महाविद्यालयांत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक यंत्रणा रुजू ठेवण्याची मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनीही पोलीस गस्त सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे- अ‍ॅड. वैभव थोरात,सिनेट सदस्य,मुंबई विद्यापीठ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई