शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

डाळींचे भाव कडाडले

By admin | Updated: October 14, 2015 03:08 IST

डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही

नामदेव मोरे, नवी मुंबई डाळींचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढत असल्याचे भासविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. शासनाचे जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारावर नियंत्रण राहिले नसल्यामुळे सामान्य नागरिकांच्या किचनचे बजेट दुप्पट झाले आहे. देशभर जीवनावश्यक वस्तंूचे दर प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांच्या आहारामध्ये रोज समावेश असणाऱ्या डाळी व कडधान्याचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत. सहा महिन्यांमध्ये बाजारभाव जवळपास दुप्पट झाले आहेत. एपीएमसीत जूनमध्ये तूरडाळ ६६ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर १३० ते १७५ पर्यंत गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये १५० ते २०० रुपये किलो दराने चांगली डाळ विकली जात आहे. मूगडाळीचे दरही १२० पेक्षा जास्त झाले आहेत. ५० ते ६० रुपयांना मिळणारी मसूरडाळही ९० ते १०० रुपये दराने विकली जात आहे. अचानक सुरू झालेल्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांना जीवन मुश्कील झाले आहे. डाळीही परवडणाऱ्या दरामध्ये मिळत नसतील तर खायचे काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दिवाळी जवळ आली असून भाव असेच राहिले तर सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये लातुर व मराठवाड्यामधून तूरडाळ येत असते. जगात सर्वाधिक डाळी भारतामध्ये खपतात. देशातील उत्पादन कमी असल्यामुळे तूर, मूग, मटकी, उडीद ही सर्व कडधान्ये आयात करावी लागतात. बर्मा, आॅस्ट्रेलिया व इतर देशातून आवक होत असते. मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला असल्याचे भासविले जात असले तरी या व्यापारामधील काही जाणकार व बाजार समितीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डाळींची मोठ्या प्रमाणात साठेबाजी सुरू आहे. नवी मुंबईमधील एमआयडीसीतील गोडावूनमध्येही साठवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारे साठेबाजी झाली आहे. किरकोळ क्षेत्रामध्ये आता मोठ्या भांडवलदारांनी प्रवेश केला असून त्यांनीही मोठ्या प्रमाणात साठेबाजी केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहा महिन्यांपासून बाजारभाव वाढत असताना शासन मात्र याविषयी काहीच कार्यवाही करत नाही. अद्याप एकाही साठेबाजावर धाड टाकली नसल्यामुळेच सामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसत आहे.