शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई

By admin | Updated: February 5, 2017 02:53 IST

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्या, याकरिता

- अरुणकुमार, मेहत्रे  कळंबोलीआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्या, याकरिता सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पनवेल तालुका पोलिसांनी एका आरोपीला दोन वर्षांसाठी तडीपार केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली.निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, या उद्देशाने गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार, तालुका पोलिसांनी हरीग्राम येथील सचदेव नामदेव म्हात्रे (२४) याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोपीवर खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांच्याकडे सादर करण्यात आला असून, त्याला १ फेब्रुवारी रोजी मंजुरीही मिळाली आहे. त्यानुसार, म्हात्रेला दोन वर्षे तडीपार करण्यात आले आहे. सध्या रेकाँर्डवरील सक्रीय असलेल्या आरोपींची पडताळणी सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात येईल.- मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.